पुणे : पनवेलमधून चोरीला गेलेली दुचाकी हांडेवाडी चौकात पकडली

उंड्री: पनवेलमधून चोरीला गेलेली दुचाकी हांडेवाडी चौकामध्ये वाहतूक विभागाच्या पोलिसांनी संशयावरून पकडली. पोलीस हवालदार संदीपकुमार गोवेकर आणि महिला पोलीस शिपाई पूजा भोसले हांडेवाडी चौकामध्ये वाहतूक नियमन करीत होते, त्यावेळी त्यांनी दुचाकीचालकाला संशयावरून थांबवून कागदपत्राची तपासणी करताच चोरीचा गुन्हा उघड झाला.

दरम्यान, पोलिसांनी वाहनाचे सविस्तर शोधून एमएच-43-बीएम-8246 दुचाकी 10 एप्रिल 2022 रोजी पनवेल येथून चोरीला गेल्याचे समजले. पनवेल शहर पोलिसांशी संपर्क साधून गाडीचे मालक रवींद्र जिरवणकर यांना बोलावून दुचाकी दिल्याचे हांडेवाडी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गोलांडे यांनी सांगितले. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक सुनील जगदाळे, पोलीस शिपाई महादेव ठाणगे व प्रवीण केदार उपस्थित होते.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *