Congress Foundation Day : तब्बल 100 वर्षानंतर नागपूरमध्ये काँग्रेसचे अधिवेशन; लोकसभा प्रचाराचा रणशिंग फुंकणार

Congress Foundation Day : स्वातंत्र्यपूर्वकाळात म्हणजेच 1920 साली काँग्रेसचे अधिवेशन नागपूरमध्ये  पार पडलं होतं. त्यानंतर आता जवळपास शंभर वर्षानंतर पुन्हा एकदा नागपूरमध्ये काँग्रेसचे अधिवेशन पार पडतांना  पाहायला मिळत आहे. नागपूर किंवा विदर्भाने काँग्रेसला नेहमीच भरभरून दिले आहेत. तसेच, आजही विदर्भात काँग्रेसची पकड पाहायला मिळते. अशात नागपूरमध्ये आज काँग्रेसचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. तर, या अधिवेशनात सोनिया गांधी, राहुल गांधी , प्रियांका गांधी , मल्लिकार्जुन खरगे यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहेत.

काँग्रेसच्या 139  व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात 'हैं तयार हम'  या 'टॅग लाईन'खाली महारॅली आयोजित करण्यात आली आहे. शहरातील बहादूरा येथील भारत जोडो मैदानावर दुपारी दोन वाजता होणाऱ्या या महामेळाव्यात काँग्रेस लोकसभा प्रचाराचा रणशिंग फुंकणार आहे. या सभेच्या निमित्ताने काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज नागपूरमध्ये उपस्थित राहणार आहेत. रॅलीच्या आयोजनासाठी राज्यभरातील काँग्रेस नेते नागपुरात मागील दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. आज येणाऱ्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या स्वागतासाठी नागपूर एअरपोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे. 

PM Narendra Modi : रामभूमीतून फुटणार भाजपच्या प्रचाराचा नारळ; नववर्षाच्या सुरूवातीलाच PM मोदींचा नाशिक दौरा

दिल्ली ऐवजी ही सभा नागपुरात का?

  • काँग्रेसचा महाराष्ट्र आणि नागपूरशी ऐतिहासिक नातं आहे..
  • 1891 साली काँग्रेसचे अधिवेशन नागपुरात पार पडले
  • 1920 साली काँग्रेसचा विशेष अधिवेशन नागपुरात पार पडलं होतं. त्या अधिवेशनामध्येच महात्मा गांधी यांना सर्वसामान्य नेता अशी ओळख मिळाली होती. याशिवाय स्वराज्य तसेच असहकार आंदोलन या प्रस्तावांवरही नागपूर चर्चा होऊन महत्त्वाचे निर्णय झाले होते.
  • 1920 च्या त्याच अधिवेशनात काँग्रेसच्या घटनेत आवश्यक बदल करून काँग्रेसची आजची संघटनात्मक बांधणी निश्चित करण्यात आली होती. 
  • स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसचा पहिला अधिवेशन 1959 मध्ये नागपूरतच पार पडला होता.या अधिवेशनात इंदिरा गांधी यांची काँग्रेस च्या अध्यक्षा म्हणून निवड झाली होती.
  •  निवडणुकीच्या काळात ऊर्जा घेऊन जोरात मैदानात उतरण्यासाठीही काँग्रेसचा नागपूर आणि  महाराष्ट्राची वेगळं नातं आहे. इंदिरा गांधी नेहमीच त्यांच्या लोकसभा प्रचाराचा बिगुल नंदुरबार मधून फुंकायच्या.. 
  • तर अडचणीच्या प्रसंगी (आणीबाणी नंतर) वैदर्भीय मतदाराने काँग्रेसला हाथ दिल्याचं अनेक वेळेला दिसून आल्यामुळे काँग्रेस नेत्यांचा विदर्भावर खास प्रेम आहे.

सभेपूर्वी पोस्टर्स वाकले... 

काँग्रेसची "है तयार हम" महारॅली होत असलेल्या भारत जोडो मैदानाच्या बाहेर मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुभाजकावर लावलेले काँग्रेस पक्षाचे पोस्टर्स खाली वाकले आहेत. रात्री काही टवाळखोरांनी ते पोस्टर्स एका बाजूला वाकवले आहे की? या मार्गावर रात्री तीव्र गतीने होणारी ट्रक्सची वाहतूक आणि त्यामुळे वाहणारी हवा यामुळे पोस्टर्स वाकले आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, सकाळपासूनच काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोस्टर्स लावणारे कर्मचारी अनेक किलोमीटर पर्यंत वाकलेले हे पोस्टर्स सरळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply