CM Relief Fund : आता एका मिस्ड कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज; शिंदे सरकारचा 'गतिमान' निर्णय

Chief Minister Relief Fund: मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळणाऱ्या मदतीचा अर्ज कुठे मिळतो? तो कसा भरायचा किंवा तो मुख्यमंत्री कार्यालयातूनच घ्यावा का? अशा विविध शंका सर्वसामान्यांच्या मनात असतात. यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना हा अर्ज करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. मात्र, आता वरील क्रमांकावर मिस्ड कॉलवर देताच तत्काळ मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज आपल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.

विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून विशिष्ट रक्कम मदत म्हणून दिली जाते. यातील अर्थसहाय्य 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मार्फत पुरविले जाते. रुग्णांना तातडीने मदत मिळावी, हा उद्देश या योजनेचा आहे. मात्र, ही रक्कम मिळवण्यासाठी नेमकी अर्ज कसा करायचा? त्यासाठी कुठे संपर्क साधायचा? याची माहिती अनेकांना नसते.

मात्र, आता एका मिस्ड कॉलवर मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मिळणार आहे. यासाठी ८६५०५६७५६७ हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर मिसकॉल केल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएसद्वारे मोबाईलवर येईल. त्या लिंकवर क्लिक करताच अर्ज डाऊनलोड होईल. 

या अर्जाची प्रिंट काढून तो अर्ज भरून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह सर्व पोस्टाद्वारे किंवा स्कॅन करून पीडीएफ स्वरूपात cmrf.maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर पाठवावा लागेल. मुख्यमंत्री सहायता निधीतून पहिल्यांदाच भाजलेल्या, शॉक लागलेल्या रुग्णांना देखील प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply