CM Eknath Shinde News: मुख्यमंत्र्यांचं 'वर्क फ्रॉम होम'! गावी असतानाही तीन दिवसांत ६५ फाईल्स निकाली

Eknath Shinde News: राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र गावी आहेत. त्यामुळे विरोधकांकडून ते सुट्टीवर असल्याची टीक करण्यात आली होती. मात्र आता कामातून उत्तर देऊ म्हणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते दाखवून देखील दिलं आहे. गावी असताना देखील शिंदे यांनी कामाचा धडाका सुरुच ठेवला असून तीन दिवसांत ६५ फाइल्स त्यांनी मार्गी लावल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या साताऱ्यातील गावी आहेत. यावरून टीका करताना विरोधकांनी मुख्यमंत्री नाराज असून सुट्टीवर गेले आहेत अशी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी मी सुट्टीवर नाही तर डबल ड्यूटीवर आहे असे प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता त्यांनी हे सिद्ध देखील केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने नुकतेच जाहीर केलेल्या एका निवेदनात शिंदे यांनी तीन दिवस ६५ फाइल्सचा निपटारा केल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यात त्यांच्या गावी असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत आहेत.

कार्यालयात नसताना सचिवालयातील फाईल्स थांबून राहू नयेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी व्हीसीद्वारे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन विविध विभागांच्या ६५ फाईल्समधील विषय मार्गी लावले असून त्या अनुषंगाने संबंधितांना सूचनाही दिल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, ठाणे सोडून अचानक साताऱ्यातील आपल्या गावी गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवरुन एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचेही बोलले जात आहे. तसेच भाजपचे वरिष्ठ नेते शिंदेवर नाराज असल्याच्या देखील बातम्या समोर आल्या होत्या. या सर्व चर्चांदरम्यान मुख्यमंत्र्यांची खुर्जी जाणार अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगल्या. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व चर्चांदरम्यानही आपल्या कामाचा धडाका सुरुच ठेवला आहे. गावी असतानाही त्यांचे काम सुरू आहे. 

फडणवीसांकडूनही कामाचा धडाका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मिशन नो पेंडेन्सी' असा हॅशटॅग देऊन दोन फोटो ट्वीट केले होते. या फोटोंमध्ये ते कार्यालयातील प्रलंबित कामे मार्गी लावताना दिसत आहेत. फोटोमध्ये फडणवीसांच्या टेबलवर फायलींचा मोठा ढिग दिसतोय आणि ते त्यावर सह्या करताना दिसत आहेत. फडणवीसांनी ट्वीट केलेल्या या फोटोंमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply