Chhatrapati Sambhajinagar News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसांत जमा करावी लागणार महत्वाची माहिती

Chhatrapati Sambhajinagar News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शुल्क माफीची माहिती जमा करण्यासाठी पुढील तीन दिवस (ता. 19 एप्रिल) मुदत वाढ देण्यात आली आहे. या याेजनेचा संभाजीनगर जिल्ह्यातील 28 गावांमधील विद्यार्थ्यांना शुल्क माफीचा लाभ मिळणार आहे.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे राज्यातील दुष्काळी भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, शुल्क प्रतीपूर्ती देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Pune News : दुचाकी चोरणाऱ्या एकास खडक पोलिसांकडून अटक; ३ दुचाकी केल्या जप्त

त्यानुसार दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील बारावीच्या 2 लाख 84 हजार 208 तर दहावीच्या 3 लाख 28 हजार 914 अशा एकूण 6 लाख 13हजार 112 विद्यार्थ्यांना या शुल्क माफीची सवलत मिळणार आहे.

यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 28 गावांमधील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. हे प्रस्ताव सादर करण्यासाठी 12 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु काही तांत्रिक अडचणीत असल्याने ही मुदत आता 19 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आहे.

राज्यात कमी पाऊस पडल्याने 40 तालुक्यातील 1 हजार 21 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची योजना जाहीर करण्यात आली होती.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply