Sambhajinagar Crime : मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, तरुणाला मारहाण करत विहिरीत फेकलं; कन्नड तालुका हादरला

Chhatrapati Sambhajinagar Crime : मुलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयावरून कुटुंबियांनी एका तरुणाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला विहीरीत फेकून दिलं. पोहता येत नसल्याने या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यात घडली मंगळवारी (ता. 8 ऑगस्ट) घडली.

नारायण रतन पवार, असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिशोर पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह 17 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून यातील 8 जणांना अटक केली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत नारायण पवार हा तरुण कन्नड तालुक्यातील खातखेडा येथील बामणवाडी गावातील रहिवाशी आहे. रतनचे आपल्या मुलीसोबत प्रेमसंबध आहे, असा संशय मुलीच्या आई-वडिलांना होता.

या संशयातून मंगळवारी दोन कुटुंबियांमध्ये वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचलं. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. दरम्यान, गावातील प्रतिष्ठित मंडळींनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.

Pune : खळबळजनक घटना! विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्याने शिक्षकाने वर्गातच संपवले आयुष्य; दौंड तालुका हादरला

मात्र, दोन्ही गटातील लोकांनी त्यांचं काहीही ऐकलं नाही. त्यामुळे या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

मुलीच्या आई-वडिलांसह नातेवाईकांनी रतन याच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत रतन गंभीर जखमी झाला होता. त्याला जखमी अवस्थेत आरोपींनी विहिरीत फेकून दिलं. पोहता येत नसल्याने रतनचा बुडून मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

पोलिसांनी नारायणचा मृतदेह विहिरीबाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 17 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून यातील 8 जणांनी अटक देखील केली आहे. प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या झाल्याने कन्नड तालुका हादरवून गेला आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply