Chhatrapati Sambhajinagar : कर्ज न दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या, प्रहार संघटना आक्रमक; इंडियन बँकेच्या कार्यालयावर फेकले शेण

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पिंपळखुटा गावातील एका शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर प्रहार संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पीक कर्जासाठी शेतकऱ्याकडून लाच मागितल्यामुळे पिंपळखुटा येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावरून संताप व्यक्त करत इंडियन बँकेवर शेण फेकले. यावेळी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पिंपळखुटा गावातील शेतकरी विठ्ठल दाभाडे यांनी काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली. बँकेने कर्ज मंजूर करून चार महिने झाले तरी खात्यात पैसे आले नव्हते. या कर्जासाठी बँक मॅनेजर तसेच एजेंटने लाच मागितली होती. मात्र पैसे न दिल्याने कर्ज मिळाले नाही, याच नैराश्येतून आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला होता.

Akola News : दूषित पाणी प्यायल्याने 49 ग्रामस्थ आजारी, तिघांची प्रकृती गंभीर;बेलखेडमध्ये आराेग्य विभाग डेरेदाखल

याप्रकरणी प्रहार संघटनेने इंडियन बँकेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज इंडियन बँकेच्या शेंद्रा येथील कार्यालयावर शेण फेकले. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणीही ही केली.

दरम्यान, यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच १५ दिवसाच्या आतमध्ये जर विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मदत मिळाली नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या घरावरही शेण फेकू, याची या सरकारने नोंद घ्यावी, असा इशाराही यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply