घरी बायकोला काय सांगू?” — गॅस सिलेंडर न मिळाल्याने संताप; ग्राहकाने स्वतःचे डोके फोडले

 

 

(Chhatrapati Sambhajinagar) :छत्रपती संभाजीनगर शहरात गॅस सिलेंडर टंचाईचा प्रश्न अजूनही कायम असून, त्यातूनच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळूज परिसरातील रांजणगाव शेपू येथील एका गॅस एजन्सीबाहेर सिलेंडर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ग्राहकाने चक्क स्वतःचे डोके फोडून घेतल्याची घटना घडली.

ही घटना आज दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास घडली. बालचंद नेमाने (वय 50, रा. रांजणगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. ते मागील अनेक दिवसांपासून गॅस सिलेंडरसाठी एजन्सीच्या फेऱ्या मारत होते. मात्र वारंवार प्रयत्न करूनही गॅस उपलब्ध न झाल्याने त्यांचा संताप अनावर झाला.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, “घरी बायकोला काय सांगू?” असे म्हणत त्यांनी संतापाच्या भरात स्वतःचे डोके फोडून घेतले. या प्रकारामुळे एजन्सीबाहेर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी नेमाने यांना उपचारासाठी घाटी रुग्णालय येथे दाखल केले.


गॅस टंचाईचा प्रश्न कायमच

इराण-अमेरिका तणाव काहीसा कमी झाला असला तरी देशातील इंधन पुरवठ्यावर त्याचा परिणाम अजूनही जाणवत आहे. शासनाकडून गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात नागरिकांना एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. याचा फटका घरगुती वापरासोबतच हॉटेल व्यावसायिकांनाही बसत आहे.

 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

2 thoughts on “घरी बायकोला काय सांगू?” — गॅस सिलेंडर न मिळाल्याने संताप; ग्राहकाने स्वतःचे डोके फोडले

Leave a Reply to Travis3094 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *