Marathwada water Crisis : उन्हाळ्याची चाहूल लागताच मराठवाड्यात टँकरची मागणी; ४० गावांमधून आले प्रस्ताव

Chhatrapati Sambhajinagar : फेब्रुवारी महिना सुरु असून आतापासून उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरवात झाली आहे. अर्थात उन्हाळ्याची चाहूल लागताच मराठवाड्यात टँकरची मागणी सुरु झाली आहे. आतापर्यंत जवळपास ४० गाव-वस्तीवर टँकरने पाणीपुरवठा करावा; अशी मागणी आल्याची सांगितले जात आहे. मात्र अद्याप एकही टँकर मंजूर झालेले नाही. आगामी काही दिवसात हे टँकर सुरु करावे लागणार आहेत.

मागील वर्षी कमी पावसाळा झाल्यामुळे सर्वत्र भीषण पाण्याची टंचाई जाणवली होती. यामुळे गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत २१६ टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. त्यात सर्वाधिक १०५ टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होते. मात्र यंदाची परिस्थिती वेगळी असून पाऊस चांगला झाल्यामुळे फारसा तुटवडा जाणवणार नाही अशी शक्यता वर्तविली जात आहे. तरी देखील मराठवाड्यातील काही भागात आतापासून टंचाईचा सामना करावा लागत आहे

Maharashtra Politics : राज-उद्धव टाळी देणार? अस्तित्वाच्या लढाईत ठाकरे बंधू एकत्र?

तरीही टँकरसाठी प्रस्ताव

मागील वर्षी काही जिल्ह्यात जास्त पाऊस, तर काही जिल्ह्यात कमी पाऊस पडला होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने मराठवाड्यात पाणीच पाणी झाले होते. या अतिवृष्टीत ३० लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले होते. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला बसला होता. एकीकडे ही स्थिती असताना दुसऱ्या बाजूला जानेवारीपासूनच अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे टँकरच्या मागणीचे अर्ज येऊ लागले आहेत.

पाण्यासाठी सुरु झाली भटकंती

दरम्यान उन्हाचा पारा वाढल्यानंतर टँकर सुरू होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात विभागातील सरासरी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास जात आहे. काही गावांमधून पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply