Chandrayaan-3 Mission : 'चांद्रयान- 3' चं सांगली कनेक्शन! रॉकेटच्या पार्ट्सचं महत्त्वपूर्ण कोटिंगचं काम सांगलीत पडलं पार

Chandrayaan-3 : भारत आणि इस्रोचा (ISRO) महत्वाकांक्षी चांद्रयान मोहिमेला सुरुवात झाली. नुकताच चांद्रयान-3 चे (Chandrayaan-3) यशस्वीरित्या प्रक्षेपण पार पडलं. भारताच्या या मोहिमकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आता सर्वांना प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याची. सध्या संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. या चांद्रयान -3 मोहिमेमध्ये (Chandrayaan-3 Mission) सांगलीचा देखील सिंहाचा वाटा आहे. या मोहिमेमध्ये सांगलीचे नेमकं कनेक्शन काय हे आपण जाणून घेणार आहोत...

चांद्रयान-3 मोहिमेला सांगलीतील एका कंपनीने हातभार लावला आहे. चांद्रयान-3 च्या रॉकेटच्या पार्ट्सचं महत्त्वपूर्ण कोटिंगचं काम सांगलीमध्ये पार पडलं आहे. या महत्वपूर्ण कामगिरीमुळे सांगलीकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. चांद्रयान -3 रॉकेटच्या पार्ट्सचं महत्त्वपूर्ण कोटिंगचं काम सांगलीतील प्रसिद्ध उद्योजक संदीप सोले यांच्या डॅझल डायनाकोएट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत ही माहिती देत कौतुक केले आहे.

अजित पवारांनी ट्वीटमध्ये सांगितले की, 'अभिमानास्पद! श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रावरून शुक्रवारी ‘चंद्रयान-3’ चंद्राच्या दिशेनं यशस्वीपणे झेपावलं. विशेष म्हणजे ह्या GSLV MK III रॉकेटच्या पार्ट्सचं महत्त्वपूर्ण कोटिंगचं काम सांगलीतील उद्योजक श्री. संदीप सोले यांच्या DAZZLE DYNACOATES PRIVATE LIMITED या फॅक्टरीत पार पडलं. ही बाब महाराष्ट्राची मान उंचावणारी आहे.' अजित पवारांच्या ट्विटनंतर ही बाब सर्वांना माहिती पडली.

Cabinet Expansion: मुहूर्त ठरला ! खातेवाटप आज पण मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर

चांद्रयान-3 च्या जीएसएलव्ही रॉकेटचा एक भाग सांगली जिल्ह्यातल्या माधवनगरमध्ये असलेल्या डझल डायनाकोटस या खासगी कंपनीमध्ये तयार करण्यात आला आहे. चांद्रयान-3 मध्ये वापरण्यात आलेला भाग सांगलीतील या कंपनीमध्ये दीड वर्षांपूर्वी तयार करण्यात आला आहे, ही माहिती कंपनीचे संचालक संदीप सोले यांनी माध्यमांना दिली आहे. या कंपनीमध्ये सध्या 'गगनयान'मध्ये वापरण्यात येणार्‍या उपकरणाची निर्मिती सुरू आहे. याआधी पीएसएलव्ही यानासाठीही याच ठिकाणी उपकरणं तयार करण्यात आली होती.

चांद्रयान- 3 चे मुंबई कनेक्शन देखील समोर आले होते. मुंबईतील विक्रोळी येथील गोदरेज कंपनीने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (ISRO) मुख्य घटकांचा पुरवठा केला आहे. चंद्रयान-3 साठीची अनेक उपकरणे गोदरेज कंपनीमध्ये तयार करण्यात आली आहेत. सर्व लिक्विड इंजिन आणि सॅटेलाइट थ्रस्टर्स याठिकाणी तयार करण्यात आले आहेत. ही सर्व स्वदेशी उत्पादने आहेत. भारताच्या वाढत्या अवकाश क्षेत्रासाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. गोदरेज 30 वर्षांहून अधिक काळ इस्रोशी संबंधित आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply