Chandrayaan-3 : विज्ञानाच्या यशासाठी देवाकडे साकडं! चांद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी सर्व धर्मांची प्रार्थना

पुणे : बहुचर्चित आणि देशाचे लक्ष असलेले चांद्रयान-३ आज चंद्रावर उतरेल. या सोहळ्याकडे सर्व देशाचे लक्ष लागलेले आहे. तर विज्ञानाचा उत्कृष्ट नमुना आणि भारताची ही महत्त्वकांक्षी मोहीम यशस्वी होण्यासाठी सगळ्या धर्माच्या नागरिकांकडून आपापल्या देवाला साकडे घालण्यात येत आहे. मस्जिद, चर्च, मंदिरामध्ये आपापल्या पद्धतीने देवाकडे साकडे घालण्यात आले आहे.

दरम्यान, नागपूर येथील टेकडीला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांकडून साकडे घालण्यात आले आहे. त्याचबरोबर भव्य यज्ञ सोहळ्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पुण्यातील दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या वतीने आज पहाटेच गणपतीचा अभिषेक करण्यात आला आहे.

यासाठी दूध, दही, विविध फळांचा रस,गणपतीच्या मुकुटावर चंद्रकोर लावत बाप्पाला सजवण्यात आले आहे. त्याचबरोबर मस्जिदमध्येसुद्धा मुस्लीम बांधवांकडून नमाज पढण्यात येत असून चांद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी अल्लाकडे साकडे घालण्यात येतंय.

इस्रोने चांद्रयानाच्या हेल्थबाबत अपडेट दिली आहे. चांद्रयान-3 मोहीम ही नियोजित वेळेनुसार सुरू आहे. सर्व यंत्रणांची नियमित तपासणी सुरू आहे, आणि विक्रम लँडरचा प्रवास अगदी आरामात सुरू असल्याचं इस्रोने म्हटलं आहे. चांद्रयानाच्या मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्समध्ये (MOX) अगदी उत्साहाचं वातावरण असल्याचंही इस्रोने सांगितलं.

D.S. Kulkarni News : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना जामीन मंजूर; 5 वर्षांनी तुरुंगातून सुटका, गुंतवणूकदारांच्या ८०० कोटींचं काय?

इस्रो नासाला मागे टाकेल

चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे, आतापर्यंत हे नासालाही शक्य झाले नाही. रशियाचे लुना-25 हे यान उतरण्याआधीच कोसळल्याने रशियाचे हे स्वप्न भंगले. आता भारताला प्रथम दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची संधी आहे. या मोहिमेकडे जगाचे लक्ष लागले आहे कारण चंद्राचा हा भाग अतिशय खडबडीत आहे, तेथे मोठे खड्डे आहेत. त्यामुळे इथे सॉफ्ट लँडिंग करणं मोठं आव्हान आहे. जर भारताचे चांद्रयान-3 येथे सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाले तर ते ऐतिहासिक ठरेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply