Chandigarh Mayor Election : चंदीगड महापौर निवडणुकीत भाजपचा विजय; काँग्रेससोबत युतीकरूनही 'आप'ला धक्का

Chandigarh Mayor Election : चंदीगडमध्ये आज महापौरपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपने बाजी मारली असून मनोज सोनकर यांची चंदीगडच्या मरापौरपदी निवड झाली आहे. त्यांनी आम आदमी पक्षाचे कुलदीप कुमार यांचा पराभव केला. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी एनडीए आणि इंडिया आघाडीतल ही पहिलीच निवडणूक होती. आपने या निवडणुकीच आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला होता.

दरम्यान कडेकोट बंदोबस्तात निवडणूक पार पडली. चंदीगड महापालिकेच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय बॅरिकेड्स लावण्यात आले होते. महापालिकेच्या इमारतीभोवती तिहेरी सुरक्षा व्यवस्था करण्यात होती, यासाठी 800 सैनिक, चंदीगड पोलिसांचे 600 कर्मचारी, ITPB आणि रॅपिड ॲक्शन फोर्सचे प्रत्येकी 100 कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

Thane Politics : ठाण्यात शिवसेना शिंदे गटाला मनसेचा जोरदार धक्का!; भिवंडीतील पदाधिकारी राज ठाकरेंच्या उपस्थितीत करणार प्रवेश

महापौरपदाची निवडणूक 18 जानेवारीला होणार होती, मात्र पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांच्या आजारपणामुळे चंदीगड प्रशासनाने निवडणूक 6 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली होती. मात्र, काँग्रेस आणि आपच्या नगरसेवकांनी या निर्णयाला विरोध केला. 35 सदस्यांच्या महापालिका सभागृहातआप आणि काँग्रेस आघाडीकडे मिळून 20 मते असून, भाजपच्या 15 मतांपुढे कडवे आव्हान होते. यामध्ये 14 नगरसेवक आणि खासदार किरण खेर यांच्या अतिरिक्त मताचा समावेश होता.

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने 24 जानेवारीच्या आपल्या आदेशात चंदीगड प्रशासनाला आज महापौर निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान आप-काँग्रेस आघाडीने विविधपदांसाठी धोरणात्मकपणे उमेदवारांची नियुक्ती केली होती. कुलदीप कुमार हे आम आदमी पक्षाकडून महापौरपदासाठी निवडणूक लढवत होते, तर काँग्रेसने वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवार उभे केले होते.

आप-काँग्रेस आघाडीला भाजपची आठ वर्षांची राजवट मोडायची होती. 2022 आणि 2023 च्या मतदानात काँग्रेसने भाग घेतला नव्हता. त्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. नगराध्यक्षपदासाठी गुप्त मतदानाद्वारे निवडणूक प्रक्रिया पार पडते. या निवडणुकीत महापौरपदाची जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होती.वरिष्ठ उपमहापौरपदासाठी भाजपचे कुलजीत संधू विरुद्ध काँग्रेसचे गुरप्रीत सिंग गाबी, तर उपमहापौरपदासाठी भाजपचे राजिंदर शर्मा आणि काँग्रेसच्या निर्मला देवी यांच्यात लढत होती, मात्र आप-काँग्रेसने या निवडणुकांवर बहिष्कार टाकला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply