Capitol Bomb Blast : कॅपिटल चित्रपटगृहातील बॉम्बस्फोट; पुण्याच्या इतिहासातील मोठी घटना

Capitol Bomb Blast : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या पुण्यातील ‘कॅपिटल’ बॉम्बस्फोटाच्या घटनेला आज 80 वर्षे पुर्ण झाली. 23 जानेवारी 1943 रोजी क्रांतिवीरांनी पुण्याच्या कॅपिटल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट घडविला.या घटनेत चार इंग्रज अधिकारी ठार झाले तर १८ जण जखमी झाले. त्या काळचं कॅपिटल चित्रपटगृहाची इमारत आता व्हिक्टरी या नावाने ओळखली जाते. 

23 जानेवारी 1943 काय झालं होतं?

‘चले जाव’ चळवळीच्या अगदी सुरवातीलाच म्हणजेच 1943 ची ही घटना. या काळात देशात ठिकठिकाणी क्रांतीकारांच्या चळवळी सुरू होत्या. अशातच पुण्यात काही कार्कर्त्यांनी एकत्र येऊन इंग्रजाविरुद्ध बंड पुकारला.

इंग्रजाची जुलमी सत्तेला कसं घालवून लावायचं, यासाठी पुण्यात एक मोठा धमाका करायचं ठरवलं. यात बाबुराव चव्हाण, बापू साळवी, एस. टी. कुलकर्णी, भास्कर कर्णिक इत्यादी कार्यकर्त्यांचा समावेश होता.

भास्कर कर्णिक यांनी खडकी येथून दारुगोळा कारखान्यातून बॉम्ब बाहेर आणण्याचे काम केले होते नंतर या बॉम्बला टाईम बॉम्बमध्ये रूपांतर केले होते आणि या क्रांतिवीरांनी २४ जानेवारी १९४३ रोजी कॅपिटल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट घडविला.

या बॉम्बस्फोटमध्ये चार इंग्रज अधिकारी तर १८ जण जखमी झाले होते. या घटनेने इंग्रजांमध्ये क्रांतिकारकांविरोधात धास्ती भरली होती. हा बॉम्बस्फोट स्वातंत्र्यसंग्रामातील एक महत्त्वाची घटना मानली जाते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply