Buldhana News : काँग्रेसला आणखी एक धक्का ? तीन वेळा आमदार राहिलेला बडा नेता अमित शाहांच्या भेटीला, भाजपमध्ये प्रवेश करणार ?

Buldhana News : काँग्रेस पक्षाला लागलेली गळती कमी होताना दिसत नाही. ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरानंतर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे तीन वेळा बुलढाण्याच्या खामगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले दिलीप सानंदा हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. 

दिलीप सानंदा यांनी देखील या चर्चांना दुजोरा दिला आहे. मुंबईत अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दिलीप सानंदा हे गेल्या अनेक दिवसापासून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे.

Maratha Andolan : परभणी जिल्ह्यात नेत्यांना गावबंदी, मराठा समाजाचा आज मूक माेर्चा

दिलीप सानंदा हे दिवंगत विलासराव देशमुख यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जात होते. मात्र विलासराव देशमुख यांचे निधन झाल्यापासून पक्षात त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचे बोलले जात आहे. 

दिलीप सानंदा यांनी १९९९ साली खामगाव विधानसभेची निवडणूक लढवली तेव्हापासून ते सलग २००९ पर्यंत काँग्रेसचे आमदार राहिले आहेत.मात्र २०१४ साली भाजपचे आकाश फुंडकर यांनी त्यांचा पराभव केला आणि २०१९ साली त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.
 
राहुल गांधी यांची पहिल्या टप्प्यातील भारत जोडो यात्रा बुलढाणा जिल्ह्यातून गेली होती. त्यावेळी दिलीप सानंदा यांनी सक्रिय सहभाग नोंदवला नसल्याचा ठपकाही काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर ठेवला होता. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पक्षात सष्क्रिय नसलेले दिलीप सानंदा हे आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply