Buldhana News : धक्कादायक! दहावीत ६५ टक्के गुण, तरीही विद्यार्थ्याने संपवलं जीवन; बुलढाण्यातील घटना

Buldhana News : दहावीचा निकाल (२७ मे) रोजी जाहीर झालाय. त्यानंतर एका दहावी पास विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली आहे. अनेकदा विद्यार्थी नापास झाल्यानंतर असं टोकाचं पाऊल उचलतात. पण, बुलढाण्यात दहावी पास विद्यार्थ्याने जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्यामुळे सर्वांना धक्का बसत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवट खंडेराव येथे गोकुळ प्रकाश ढेंगे नावाचा मुलगा दहावीत शिकत होता. यंदा त्याने दहावीची परीक्षा दिली होती. काल दुपारी एक वाजता दहावीच्या परिक्षेचा निकाल लागला. त्याने त्याचा निकाल चेक केला. परिक्षेत गोकुळला ६५ टक्के मार्क्स मिळाले होते.

Sambhajinagar News : भाजप नेत्याच्या सुसाट कारने पिता-पुत्राला उडवलं; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

त्यानंतर गोकुळ  घरातील वरच्या माळ्यावर गेला आणि गळफास घेऊन जिवन संपवलं आहे. त्याच्या मृत्युमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, तर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतक गोकुळ याने शेगाव येथील शाळेत शिकुन दहावीची परीक्षा दिली होती. आता या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करत आहे.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply