Budget 2024 : सत्तेचा व्यापार वाचविण्यासाठी हजारो कोटींची खंडणी; बजेटवरून संजय राऊत आक्रमक, PM मोदींवर हल्लाबोल

Budget 2024 : संसदेत काल देशाचा अर्थसंकल्प सादर झालाय. यावरून आता विरोधक आक्रमक होताना दिसत आहे. सत्तेचा व्यापार वाचविण्यासाठी नितिश कुमार आणि चंद्राबाबु नायडू यांना हजारो कोटींची खंडणी देण्यात आलीय. कागदावर हे स्पष्ट दिसत आहे, असा घणाघात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केलाय.

सरकार वाचवण्याचं बजेट आहे, असा टोला संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. पुर्वीच्या काळी गुजरातचे सरदार इस्ट इंडिया कंपनीचे मदत घ्यायचे, तसा हा प्रकार असल्याची टीका देखील त्यांनी (Thackeray Group Leader Sanjay Raut) केलीय. हे लोकसभा पीडित अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्रात यांना यश मिळालं नाही आणि मिळणार देखील नाही, असं संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलले आहेत.

Sassoon Hospital : ससूनमधील आणखी एक धक्कादायक प्रकार उघड, सहप्राध्यापकाला केले अधीक्षक; यलप्पा जाधव यांच्यावर कारवाई होणार का?

PM मोदींवर हल्लाबोल

बिहारच्या पुरासाठी निर्मला सितारामन यांनी निधी दिला, त्यांना महाराष्ट्राचा पूर दिसला नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी काल सादर झालेल्या बजेटवरून विचारला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारला सतत कर देत आलं आहे. महाराष्ट्राच्या खासदारांनी वेगळं आंदोलन करायला पाहिजे. महाराष्ट्रावर ८ लाख कोटी कर्ज आहे. गिरीश महाजन निधी मागायला गेले असता अर्थमंत्री म्हणतात जमिनी विकू का? असं म्हणत असल्याचा खुलासा संजय राऊत यांनी केलाय.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची निदर्शने

एक फुल दोन हाफ मुख्यमंत्री यांच्यातील संघर्ष महाराष्ट्र बघत आहे. राज्यात आता महाविकास आघाडीचे नेते काल सादर झालेल्या अर्थसंकल्पावरून आक्रमक झालेत. काल संसदभवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली होती. अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीही दिला नसल्याचा आरोप केला जात आहे. आज देखील संजय राऊतांनी अर्थसंकल्पावरून एनडीए सरकारवर निशाणा साधला आहे.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply