BSNL Towers : पुन्हा सुरु झालं BSNLचं युग ! देशभरात १५ हजार नवे टॉवर्स, मिळणार सुपरफास्ट 4G आणि 5G नेटवर्क

BSNL Towers : पुन्हा सुरु झालं BSNLचं युग ! देशभरात १५ हजार नवे टॉवर्स, मिळणार सुपरफास्ट 4G आणि 5G नेटवर्क
बीएसएनएलने आतापर्यंत 15 हजारांहून अधिक 4G साइट्स सक्रिय केल्या आहेत. 'आत्मनिर्भर भारत' या मोहिमेअंतर्गत उभारलेल्या या साइट्समुळे देशभरात नेटवर्क कव्हरेज वाढेल. या सर्व साइट्समध्ये भारतातच तयार केलेले उपकरणे वापरण्यात आली आहेत, यामुळे बीएसएनएलच्या 4G सेवा पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहेत.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बीएसएनएलच्या 4G सेवाच्या देशव्यापी लाँच वेळापत्रक जाहीर केला आहे. त्याचबरोबर बीएसएनएलच्या 5G सेवांच्या सुरुवातीच्या अपेक्षित कालावधीचीही माहिती दिली.
ऑक्टोबरच्या अखेरीपर्यंत 80 हजार टॉवर आणि मार्चपर्यंत उर्वरित 21 हजार टॉवर अशा एकूण एक लाख टॉवर 4G नेटवर्कसाठी मार्च 2025 पर्यंत तयार होतील. या विस्तारामुळे जलद डाऊनलोडिंग आणि सुधारित टीव्ही स्ट्रीमिंग होईल, असेही त्यांनी सांगितले.

Pune : मुलगा पवना धरणात बुडाला; पालकांनी राज्य सरकारविरोधात दाखल केला खटला, म्हणाले…

 

4G च्या सोबतच बीएसएनएलने 5G च्या चाचण्याही सुरू केल्या आहेत. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बीएसएनएलच्या स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित 5G नेटवर्कचा वापर करून व्हिडिओ कॉल केला. यामुळे बीएसएनएलच्या येणाऱ्या 5G सेवेची उत्सुकता वाढली आहे.
बीएसएनएलला पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि नेटवर्क सुधारण्यासाठी केंद्र सरकारने यावर्षीच्या बजेटमध्ये 83 हजार कोटी रुपयांहून अधिकची तरतूद केली आहे. यामुळे बीएसएनएलच्या नेटवर्कचे सुधारणे आणि सेवा दर्जा वाढणार आहे.

बीएसएनएलच्या या महत्वकांक्षी पावलामुळे देशातील दूरसंचार क्षेत्रात नक्कीच क्रांती होईल.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply