BPSC Exam Controversy : विद्यार्थ्यांच्या आंदोलनात नेत्यांची एन्ट्री, बिहारच्या राजकारणाची दिशा बदलणार?

 

BPSC Exam Controversy  : बिहार लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या उमेदवारांच्या आंदोलनाला आता राजकीय रंग चढला आहे. राजद आणि जनसुराज पक्षानं नितीशकुमार सरकारच्या दडपशाही विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्याचं हे आंदोलन राजकारणाची दिशा बदलेल, अशी शक्यता आहे. पाहूया एक रिपोर्ट...

बिहार लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या उमेदवारांच्या आंदोलनाला आता राजकीय रंग चढला आहे. विरोधी पक्षांनी सरकारविरोधात मोर्चा काढला. बिहारमध्ये बीपीएससी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून पाटण्यात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. मात्र आयोगाने विद्यार्थ्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. रविवारी पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीचार्ज आणि पाण्याच्या फवाऱ्याचा वापर केल्याने हे प्रकरण अधिकच तापले आहे. ज्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले असून विद्यार्थी मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर ठाम आहेत. प्रशांत किशोर यांच्या जन सूराज पार्टीने पाटणा येथील गांधी मैदानावर विद्यार्थी संसदेचे आयोजन केले होते.

Pune Railway Station : २ नवे फ्लॅटफॉर्म, ४ फलाटाचा विस्तार, ३०० कोटींमध्ये पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार!

बीपीएससीच्या 70 व्या परीक्षेच्या संदर्भात बिहारमधील राजकीय वातावरण तापलंय. लाठीमाराच्या निषेधार्थ ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन (AISA) सह विविध संघटनांनी बिहार बंदची हाक दिली आहे. बिहार सरकारने विद्यार्थ्यांवर अत्याचार केले आहेत. आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत आणि परीक्षा पुन्हा घ्याव्यात अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केलीये.

बिहार लोकसेवा आयोगाची 70 वी एकत्रित स्पर्धात्मक (प्राथमिक) परीक्षा 13 डिसेंबर रोजी घेण्यात आली. परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत आणि परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी देखील करत आहेत. मात्र, आयोगाने केवळ पाटणा येथील बापू परीक्षा संकुल केंद्रावर होणारी परीक्षा रद्द करून 4 जानेवारी रोजी पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने बिहारच्या राजकारणाची दिशा बदलतेय. एव्हढं मात्र निश्चित..

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply