Borivali News : बोरिवलीत १६ व्या मजल्यावरून पडून तिघांचा मृत्यू; इमारतीचं बाधकाम सुरू असताना दुर्घटना

Borivali News : बोरिवली पश्चिमेकडील एका निर्माणाधीन इमारतीचा सोळाव्या मजल्यावरील मचान कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असून शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुपारी सव्वा एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मनोरंजन समाज (वय ४२), शंकर वैद्य (२५), पियुश हरदार (३८) अशि मृतांची नावे आहेत, तर सुशिल गुप्ता (३५) यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Nandurbar News : काँग्रेसला नंदुरबारमध्ये खिंडार! राहुल गांधींच्या यात्रेची एन्ट्री, तिथेच बड्या नेत्याचा पक्षाला रामराम

 

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पश्चिमेकडील कल्पना चावला चौकातील सोनी वाडी येथे 24 मजली इमारतीचं बांधकाम सुरू आहे. दरम्यान आज दुपारी 16 व्या मजल्याचं मचान अचानक कोसळलं. यात चार कामगार जखमी झाले होतो. त्यांना ताबडतोब कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिघा कामगारांना मृत घोषित करण्यात आलं. तर चौथ्या कामगाराची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्यांने दिली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply