भोपाळ/इंदूर: मध्य प्रदेशातील २०१९ मधील अत्यंत बहुचर्चित आणि हायप्रोफाईल 'हनीट्रॅप' (Honeytrap Case) प्रकरणातील मुख्य आरोपी श्वेता जैन हिला पोलिसांनी पुन्हा एकदा भोपाळमधून ताब्यात घेतले आहे. एका बड्या बिल्डर आणि दारू व्यावसायिकाला ब्लॅकमेल करून १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी आणि "व्यवसायात ५० टक्के पार्टनर हो, नाहीतर जीवे मारू," अशी धमकी दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. श्वेता जैन पुन्हा सक्रिय झाल्याचे समोर आल्याने संपूर्ण मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?हा संपूर्ण प्रकार तक्रारदार हितेंद्र सिंह उर्फ चिंटू ठाकूर (रा. इंदूर) यांच्या तक्रारीवरून समोर आला आहे. हितेंद्र सिंह हे मालमत्ता आणि दारू व्यवसायात कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची ओळख अलका दीक्षित आणि लखन चौधरी नावाच्या व्यक्तींशी झाली होती. अलका दीक्षितसोबत ५० टक्के भागीदारीचा (Partnership) करार करण्यासाठी हितेंद्र यांच्यावर सातत्याने दबाव टाकला जात होता. मात्र, हितेंद्र यांनी या कराराला स्पष्ट नकार दिला. याच नकाराचा वचपा काढण्यासाठी २८ एप्रिलच्या रात्री जेव्हा हितेंद्र सिंह हे सुपर कॉरिडॉरवरून आपल्या गाडीतून जात होते, तेव्हा आरोपींनी त्यांची गाडी अडवली. अलका दीक्षित, तिचा मुलगा जयदीप, लखन चौधरी आणि इतर काही गुंडांनी हितेंद्र यांना कारमधून ओढून बेदम मारहाण केली.
"आमचे ५०% पार्टनर व्हा, नाहीतर एक कोटी रुपये द्या," अशी धमकी देत आरोपींनी त्यांच्या कुटुंबाला संपवण्याची आणि आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तपासात समोर आले 'हनीट्रॅप' क्वीनचे नावया प्रकरणी इंदूर पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांच्या गुन्हे शाखेने संशयितांचे कॉल रेकॉर्ड्स (CDR), मोबाईल चॅट्स, आर्थिक व्यवहार आणि सोशल मीडिया कनेक्शन तपासले. या तांत्रिक विश्लेषणामध्ये एका मोबाईल क्रमांकावरून सातत्याने या संपूर्ण कटाचे नियोजन केले जात असल्याचे उघड झाले. हा नंबर दुसरा कोणाचा नसून २०१९ मधील कुप्रसिद्ध हनीट्रॅप प्रकरणातील मुख्य आरोपी श्वेता स्वप्निल जैन हिचा होता.भोपाळमधून नाट्यमय अटकश्वेता जैनचे नाव समोर येताच इंदूर पोलिसांचे एक विशेष पथक तातडीने भोपाळला रवाना झाले.
भोपाळमधील मिनाल रेसिडेन्सी परिसरातून पोलिसांनी श्वेता जैन हिला अत्यंत गोपनीय रितीने ताब्यात घेतले. २०१९ च्या हायप्रोफाईल प्रकरणात अनेक मोठे नेते, आयएएस (IAS) अधिकारी आणि उद्योगपतींना मुलींच्या जाळ्यात अडकवून त्यांचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप श्वेतावर होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर तिने पुन्हा एकदा आपला जुना ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा (Extortion) नेटवर्क सक्रिय केल्याचे या तपासातून उघड झाले आहे.या नव्या गुन्ह्यात श्वेताची नेमकी काय भूमिका होती आणि तिने आणखी किती बड्या व्यावसायिकांना आपल्या जाळ्यात ओढले आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



