Bhatghar Dam at Bhor : दुर्दैवी! पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला; भाटघर धरणाच्या पाण्यात बुडून मुलीसह वडिलांचा मृत्यू

Bhatghar Dam at Bhor in Pune : पुण्यातील भोर तालुक्यात दुर्दैवी घटना घडली. भाटघर धरण बॅक वॉटरजवळील वेळवंड पांगारी खोऱ्यातील जयतपाड येथे पर्यटनासाठी आलेल्या मुलीचा आणि तिच्या वडिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

भोर तालुक्यातील भाटघर धरण बॅक वॉटरला असलेल्या वेळवंड पांगारी खोऱ्यातील जयतपाड येथे ही दुर्दैवी घटना घडली. मुलगी आपल्या वडिलांसह पर्यटनाला येथे आल्या होत्या. पाण्यात पोहायला उतरलेल्या मुलीसह वडिलांचाही मृत्यू झाला. मुलीचा मृतदेह सापडला होता. मात्र, वडील बेपत्ता होते. त्यांचाही मृतदेह आज सकाळी सापडला. दोघांचे मृतदेह भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आले.

ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी (वय १३ ) आणि तिचे आईवडील, इतर दोन मैत्रिणी आणि त्यांचे कुटुंबीय हे सुट्टी असल्याने जयतपाड (ता. भोर) येथे फार्म पर्यटनासाठी गेले होते.

Raj Thackrey : चांद्रयान 3 चंद्रावर पाठवलं, आपल्याला काय उपयोग?, खड्ड्यांवरून राज ठाकरेंनी काढली खरडपट्टी

हे सर्व जण काल, मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास फार्मच्या पाठीमागील बाजूस असलेल्या भाटघर धरणाचे बॅकवॉटर पाहण्यासाठी आणि तेथे असलेला धबधबा व बेबी पूल पाहण्यासाठी धरणाच्या कडेला गेले. शिरीष मनोहर धर्माधिकारी (वय ४५) (रा. औंध पुणे) हे धरण्याच्या पाण्यात उतरले. त्यानंतर शिरीष यांनी ऐश्वर्याला खोल पाण्यात जवळ बोलावून घेतले. ऐश्वर्या आणि शिरीष मनोहर धर्माधिकारी हे दोघे पाच ते सहा मिनिटे खोल पाण्यात पोहत होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply