BEST Workers Diwali Bonus : बेस्ट कर्मचाऱ्यांची आज दिवाळी, २९ हजारांचा बोनस खात्यात होणार जमा

BEST Workers Diwali Bonus : मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांचा रखडलेला दिवाळी बोनस आज मिळणार आहे. तब्बल २७ हजार रुपयांचा बोनस आज बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस रखडला होता पण आता तो त्यांना मिळणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेची आचारसंहिता संपल्याबाबतचे परिपत्रक मुंबई महानगर पालिका प्रशासनाला सोमवारी संध्याकाळी मिळाले. त्यामुळे आता आचारसंहिता संपली असल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांना रखडलेला दिवाळी बोनस आज त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आज बेस्टच्या २७ हजार कर्मचाऱ्यांचा रखडलेला २९ हजार रुपयांचा बोनस आज त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेने दिली आहे.

Eknath Shinde Resign : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा, राजभवनावर हालचालींना वेग

 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यामध्ये १५ ऑक्टोबर रोजी आचारसंहिता लागू करण्यात आली होती. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस रखडला होता. मुंबई महानगर पालिकेने आचारसंहिता लागू होण्याआधीच म्हणजेच दिवाळीच्या १० दिवस आधी पालिका कर्मचाऱ्यांना २९ हजारांचा बोनस दिला होता. पण बेस्ट कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळाला नव्हता त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी होती.

बेस्टचे कार्मचाऱ्यांनी दिवाळी बोनस कधी मिळणार याबाबत वारंवार पाठपुरावा देखील केला होता. त्यासाठी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाची देखील मदत घेतली होती. बोनससाठी त्यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. अखेर आचारसंहिता संपल्यानंतर बोनस मिळेल असे त्यांना सांगण्यात आले होते. अखेर आज त्यांना बोनस मिळणार आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply