Beed News : बीडमध्ये भररस्त्यावर हल्ला, डोळ्यात मिरची पावडर आणि कात्रीनं सपासप वार

Beed News : गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना पाहता बीड हे गुन्हेगारांचं हॉटस्पॉट ठरलं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हत्या आणि हवेत गोळीबार, या बातम्या ताज्या असतानाच आणखी एक खळबळजनक बातमी समोर येत आहे.

जुन्या वादाच्या कारणावरून डोळ्यात मिरची पावडर टाकत कात्रीनं जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथे घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गुरूवारी सायंकाळच्या सुमारास बीडच्या लोणगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादातून एकाने डोळ्यात मिरची पावडर टाकत केस कापण्याच्या कात्रीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. तुझ्या भावाने माझ्यावर केस का केली? असा जाब विचारत डोळ्यात मिरची पावडर टाकून कात्रीनं हल्ला केला. या प्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Pune : पुणे हादरले! जन्मदात्या आईनेच २ चिमुकल्यांचा बळी घेतला, झोपेतच गळा दाबला, पतीवरही कोयत्याने वार

अनिल आत्माराम गायके हा तरुण लोणगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून घरी चालत जात होता. यादरम्यान, सोनकांबळे यांच्या किराणा दुकानासमोर गावातीलच आरोपी गोपाळ पांडुरंग राऊत यानं हातातील मोबाईल फोन हिसकावून घेत मोबाइल जमिनीवरच फोडला. नंतर मिरची पावडर त्याच्या डोळ्यात टाकली आणि कात्रीने त्याच्या छातीवर सपासप वार केले.

या हल्ल्यात अनिल गायके याने आरडाओरडा केला. अनिल गायकेचा आवाज ऐकताच त्याचा भाऊ ज्ञानेश्वर गायके पळत आला. त्याच्याही मानेवर राऊत याने कात्रीने वार केले. त्यानंतर रस्त्यावरील लोकांनी त्या ठिकाणी धाव घेत गायके भावडांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गोपाळ राऊत याने तेथून पळ काढला. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, गोपाळ राऊत याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दिंद्रुड पोलीस करीत आहेत

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply