Beed Maratha Protests Violence Case : बीड जाळपोळ प्रकरणी टोळीप्रमुखाला बेड्या, आरोपी शिंदेंच्या शिवसेनेच्या तालुकाप्रमुखाचा नातेवाईक

Beed Maratha Protests Violence Case : शहरात आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी 30 ऑक्टोबर रोजी दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या घटनेनंतर पोलिसांनी सहा टोळी प्रमुखांना अटक केली आहे. यामध्ये एक टोळी प्रमुख असलेला पप्पू शिंदे हा बीडमधील शिंदे गटाच्या शिवसेनचे तालुकाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा नातेवाईक आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याला देखील अटक केली आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडून त्याची पोलीस कोठडी आणखी वाढवून मागितली जाणार आहे 

मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान पप्पू शिंदे याने एका सराफा व्यापाऱ्याला संपवण्याची धमकी दिल्याची तक्रार देखील पोलिसाकडे आहे. तर, याच आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर पप्पू शिंदे याने अनेक आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. विशेष म्हणजे एका टोळीचा प्रमुख असलेला पप्पू शिंदे हा शिंदे गटाचे तालुकाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा नातेवाईक असल्याने पोलिसांवर दबाव असल्याचे राजकीय आरोप झाले होते. मात्र, यामध्ये आम्ही निष्पक्ष पद्धतीने तपास करत असल्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले आहे. 

Vinayak Raut : शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही; विनायक राऊतांचा सरकारला इशारा

आतापर्यंत 2000 हून अधिक लोकांची चौकशी

बीडमधील हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरु असून, यासाठी वेगवेगळे पथक तयार करण्यात आले आहे. बीड पोलिसांनी आतापर्यंत 2000 हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये आतापर्यंत 254 जण पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ज्यात 17 अल्पवयीन मुलांचा देखील जाळपोळ आणि दगडफेकीमध्ये सहभागी असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एकाही आरोपीला अद्याप जामीन मिळालेला नाही. तर 13 आरोपींनी जामिनासाठी बीडच्या कोर्टात अर्ज केला होता. मात्र, त्यांचा देखील जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. तर, आतापर्यंत जे आरोपी पोलिसांनी अटक केले आहेत यामध्ये सर्वजण हे बीड जिल्ह्यातील आहेत. एकही आरोपी हा जिल्ह्याबाहेरचा आरोपी नसल्याचे निष्पन्न झालं असल्याची माहिती बीड चे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे. 

 नुकसानीची आरोपींकडून भरपाई होणार

बीड शहर आणि माजलगाव मध्ये झालेल्या हिंसाचारात अकरा कोटी रुपयांचे नुकसान झाले. या सर्व नुकसानीची वसुली या प्रकरणातील आरोपीकडून केली जाणार असून तसा अहवाल तयार होत आहे. आरोपींनी ही भरपाई दिली नाही तर त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करून वसुली होईल असे पोलिसांनी याआधीच स्पष्ट केले आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply