Beed Crime : धक्कादायक! गोळीबार अन् तलवारबाजीच्या घटनेने बीड हादरले; 4 जण गंभीर जखमी

Beed : बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्या,गोळीबार, हाणामारी या सारख्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता बीड शहरात गोळीबार आणि तलवारबाजी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

बीड शहरात गोळीबार आणि तलवारबाजी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात 4 जण जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुन्या भांडणाच्या कारणावरून हा वाद झाला. यात दोन्ही गटाचे लोक अमाने सामने आले. यावेळी एकमेकांवर गोळीबार करत हवेतही गोळीबार करण्यात आला. ही घटना बीड शहरातील कालीकानगर भागात रात्री 11 वाजता घडली आहे.

दरम्यान हा मामा-भाचे गँगचा वाद आहे. गोपाळ भिसे, मनिराम गायकवाड यांना गोळी लागली आहे. तर मारोती गायकवाड, नारायण गायकवाड या दोघांवर तलवारीचे वार करण्यात आले आहेत. दरम्यान पोलिसांनी आसाराम गायकवाड यास ताब्यात घेतले असून गावठी कट्टा जप्त केला आहे.तर याप्रकरणी  शिवाजीनगर पोलीस  ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply