Beed Crime : ‘माझी बायको हार्ट अटॅकने गेली’ असा दावा; अंत्यविधीची घाई सुरू असतानाच टीप मिळाली, पोलिसांनी फोन फिरवताच धक्कादायक सत्य उघड

Beed : बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील हातोला येथे शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्याने पत्नीचा डोक्यात काठीने वार करून निर्घृण खून केल. त्यानंतर तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव रचून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावी नेला. मात्र, बर्दापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा थरारक बनाव उघड झाला.

अंत्यविधीच्या पूर्वीच मृतदेहासह बनाव करणाऱ्या पतीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही खळबळजनक घटना अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातोला शिवारात घडली आहे. शीलाबाई सुरेश शेरफुले (वय ४५, रा. आलुरा, ता. देगलूर, जि. नांदेड) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Pune Railway : लॉन्ग वीकेंडला प्रवाशांचे हाल; ब्लॉकमुळे पुणे–नागपूर मार्गावरील अनेक एक्सप्रेस रद्द, कोणत्या गाड्यांवर परिणाम?

मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, सुरेश शेरफुले हा हातोला येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करण्यासाठी त्याच्या पत्नीसह राहत होता. मागील ३-४ दिवसांपासून तो गावाकडे जाऊ म्हणून पत्नीकडे आग्रह धरत होता, परंतु ती तयार नव्हती. याच कारणावरून दोघांत तीव्र वाद झाला असल्याची चर्चा आहे. रागाच्या भरात सुरेशने जाड भरीव काठीने शीलाबाईच्या डोक्यात एकामागून एक अनेक वार केले. या हल्ल्यात शीलाबाई रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सुरेशने हा खून पचवण्यासाठी परिसरातील लोकांना आणि गावाकडे नातेवाईकांना शीलाबाईचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे खोटे सांगितले.

गुन्हा लपवण्यासाठी सुरेशने तातडीने एक क्रुझर गाडी भाड्याने केली आणि मृतदेह घेऊन थेट देगलूर तालुक्यातील आलुरा गाठले. मात्र, बर्दापूर पोलिसांना या संशयास्पद मृत्यूची गुप्त माहिती मिळाली. बर्दापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी वेळ न घालवता देगलूर पोलिसांशी संपर्क साधला. देगलूरचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ सूर्यवंशी यांनी तातडीने आलुरा गाव गाठले. तिथे शीलाबाईच्या माहेरच्या लोकांनाही डोक्यावरील जखमा पाहून संशय आला होता. पोलिसांनी अंत्यसंस्कारापूर्वीच मृतदेह ताब्यात घेऊन पती सुरेशला ताब्यात घेतले.

सुरेश शेरफुले हा सध्या संशयित आरोपी हा अखेर बर्दापूर पोलिसांच्या ताब्यात असून मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असून त्यानंतर या गुन्ह्यात आणखी खुलासे समोर येतात का तसेच या घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेचा अधिक तपास बर्दापूर पोलीस करत असल्याची माहिती संबंधित पोलिसांनी दिली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

2 thoughts on “Beed Crime : ‘माझी बायको हार्ट अटॅकने गेली’ असा दावा; अंत्यविधीची घाई सुरू असतानाच टीप मिळाली, पोलिसांनी फोन फिरवताच धक्कादायक सत्य उघड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *