Barsu Refinery Project News : बारसू रिफायनरीच्या आंदाेलक महिलांना उष्माघाताचा त्रास, रुग्णालयात हलवलं

Barsu Refinery Project Latest Update : बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासशेकडाे ग्रामस्थांनी विराेध  र्शविला आहे. आज (साेमवार) सकाळपासून बारसू प्रकल्प ज्या ठिकाणी हाेऊ घातला आहे. तिथंपर्यंत शेकडाे ग्रामस्थांनी लाॅंग मार्च काढत प्रकल्पास तीव्र विराेध दर्शविला आहे. दरम्यान या आंदाेलनात दाेन महिलांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. 

बारसू माळरानावर सध्या ग्रामस्थांनी रिफायनरीच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. रिफायनरी विरोधातील आंदोलनातील एका महिलेला दुपारी 12 च्या सुमारास उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर आजूबाजूच्या महिलांनी आणि ग्रामस्थांनी महिलेला रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने रुग्णालयात जाण्यास दिला नकार दिला.जीव गेला तरी चालेल पण रुग्णालयात जाणार नाही अशी महिलेने ठाम भूमिका घेतली.

दरम्यान दुपारी दाेन वाजता काही महिलांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना सावलीत नेण्यात आले. या आंदाेलनात सहभागी झालेल्या वनिता गुरव या महिलेला उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. तिला तात्काळ महिलांनी वार घातलं. त्यानंतर एका वाहनातून रुग्णालयात हलवले. यावेळी वनिता देखील आंदाेलनस्थळीच थांबण्यासाठी हट्ट धरत असल्याचे दिसून आले.

रिफायनरीचा प्रकल्प रेटला जाताेय : खासदार विनायक राऊत

खासदार विनायक राऊत यांनी रिफायनरीचा अट्टहास धरणा-या शिंदे- फडणवीस सरकारवर टीकास्त्र साेडले. सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी बाेलताना खासदार विनायक राऊत म्हणाले रिफायनरीचा ध्यास घेतलेल्या या राज्यकर्त्यांनी पोलीसी यंत्रणेचा दुरूपयोग करून लोकांची डोकी फुटली तरी चालतील; पण रिफायनरीचा प्रकल्प पुढे रेटायचा अशा पद्धतीने त्यांनी कामाला सुरूवात केली आहे.

उद्धव ठाकरे ग्रामस्थांना भेटणार

राऊत म्हणाले आज त्याठिकाणच्या आंदाेलनात चार हजाराच्या वर महिला तिथे जमा झाल्या आहेत. फार मोठ्या प्रमाणात पोलीसी अतिरेक केला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी याची गंभीररित्या दखल घेतली असून ते उद्याच या पोलिसी अतिरेकीपणाच्या विरीधात आपली भूमिका मांडणार आहेत. आणि जर गरज पडली तर आम्ही राज्यपालांची भेट घेणार आहोत अशी भूमिका प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी व्यक्त केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply