Sunetra Pawar : सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार; बारामतीत घडामोडींना वेग...

Baramati : लोकसभा निवडणूकीपासून बारामतीत राजकीय वातावरण कमालीचे तप्त असून निकालानंतरही बारामतीत कमालीच्या वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांचा विजय झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेत बारामतीवरील आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. खासदारकी नंतर सुनेत्रा पवार यांना केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्रीपद मिळण्याचीही चर्चा वेगाने सुरु आहे.
लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांनी भाजपसोबत जात महायुतीतून सुनेत्रा पवार यांना बारामतीतून उभे केले होते.

निकालानंतरही अजित पवार यांनी महायुतीसोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत असून बारामतीच्या सर्वांगिण विकासासाठी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. सुनेत्रा पवार विजयी होण्याइतपत संख्याबळ असल्यानेच अजित पवार यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट आहे. बारामतीतून शरद पवार, सुप्रिया सुळे व आता सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून तीन खासदार मिळतील अशी चिन्हे आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा या निमित्ताने केंद्रीय निधीतून मोठा विकास होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे.

Manoj Jarange Patil : मोठी बातमी! सरकारला जरांगे पाटलांकडून एक महिन्याचा वेळ; म्हणाले, काम न केल्यास...

शरद पवार यांनीही लक्ष केंद्रीत केले....

लोकसभा निवडणूकीत बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांना मताधिक्य देत शरद पवार याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखविला होता. स्वता शरद पवार हे आता बारामतीत लक्ष केंद्रीत करत असून त्यानी शहर व तालुक्यात दौरा करीत शेतकरी व कष्टक-यांना डोळ्यासमोर ठेवत काम करण्याचे सुतोवाच केलेले आहे. बारामतीत नवीन बांधणी त्यांच्याकडून वेगाने सुरु असून त्या मुळे विधानसभेच्या निवडणूकीत शरद पवार काय भूमिका घेणार या कडे सवचिच लक्ष आहे.
दुजेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा सर्वत्र सुरु असून त्यांना संधी दिली जाते की शरद पवार पुन्हा एखादा नवीन काही प्रयोग करतात याचीही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. विधानसभेत सरकार बदलण्याचे रणशिंग बारामतीतून फुकून पवारांनी राज्यातच एक वेगळा संदेश दिला असल्याने कार्यकर्त्यात कमालीचा उत्साह संचारला आहे. अजित पवार यांनीही सुनेत्रा पवार यांना संधी देत केंद्रीय पातळीवर त्या व राज्यस्तरावर स्वता अजित पवार असे समीकरण जुळविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून बारामतीत नजरेत भरेल असा विकास करण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न आहे.
कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण.....

अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांत निकालानंतर निरुत्साह होता, आता मात्र सुनेत्रा पवार राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून जाणार असल्याने कार्यकर्त्यात उत्साह संचारल्याचे दिसत होते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply