Banking Alert News : आरबीआयची सोलापूरमधील बँकेवर मोठी कारवाई, कर्ज, ठेवी आणि गुंतवणुकीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?

Banking Alert News : सोलापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बँकिंग नियमन कायदा-१९४९ च्या कलम ५६ सह, कलम ३५ अ च्या उपकलम (१) अंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँकेने सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेच्या व्यवहारावर निर्बंध घातले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार ७ ऑक्टोबरला व्यवहाराच्या समाप्तीपासून समर्थ बँक पूर्व मंजुरीशिवाय कोणतेही कर्ज आणि आगाऊ रक्कम मंजूर किंवा नूतनीकरण करू शकत नाही. शिवाय कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही. निधी उधार घेणे आणि नवीन ठेवी स्वीकारणे यासह कोणतेही दायित्व स्वीकार करू शकत नाही.

समर्थ बँक आपले दायित्वे पूर्ण करताना कोणतेही पेमेंट वितरित करू शकत नाही, किंवा वितरित करण्यास सहमती देऊ शकत नाही. तसेच कोणत्याही तडजोड किंवा व्यवस्था करू शकत नाही, असे बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ‘आरबीआय’ला सूचित केल्याशिवाय, बँक कोणत्याही मालमत्तेची मालमत्तेची विक्री, हस्तांतरण किंवा अन्यथा विल्हेवाट लावू शकत नाही.

बँकेची सध्याची स्थिती पाहता समर्थ बॅंकेने बचत बँक किंवा चालू खात्यातून तसेच ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी देऊ नये. परंतु आरबीआय निर्देशात नमूद केलेल्या अटींनुसार ठेवींवर कर्ज फेडण्याची परवानगी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बँकिंग परवाना रद्द केल्याचे मानू नये. बँक तिची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत निर्बंधात समर्थ बॅंकेचे व्यवहार सुरू राहतील.

यादरम्यान ‘आरबीआय’कडून समर्थ बँकेच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष असणार आहे. परिस्थितीनुसार आणि ठेवीदारांच्या हितासाठी निर्देशात ‘आरबीआय’ आवश्यकतेनुसार बदल करेल. हे निर्देश ७ ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहतील, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *