Bangladeshi People Arrested : बेकायदेशीर देशात राहणाऱ्या १६ बांगलादेशींना अटक, मुंबईसह उपनगरात पोलिसांची छापेमारी


Bangladeshi People Arrested : मुंबई पोलिसांनी अवैध बांगलादेशी स्थलांतरितांवर कारवाईचा बडगा उगारलाय. डीसीपी डॉ. प्रवीण मुंढे (झोन 1) यांच्या नेतृत्वाखालील विशेष पोलिस पथकाने मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथे कारवाई केली, परिणामी शनिवारी आणखी १६ बेकायदेशीर स्थलांतरितांना (सात पुरुष आणि नऊ महिला) अटक करण्यात आली.

याआधी चेंबूर RCF मध्ये ७ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी लोक अवैधपणे राहतात. या नागरिकांमधील अनेकांनी नागरिकत्व प्रस्थापित करण्यासाठी खोटी भारतीय ओळखीची कागदपत्रे बनवली आहेत. या कागदपत्राच्या आधारे ते वर्षानुवर्षे या शहरांमध्ये राहत आहेत. हे बेकायदेशीर स्थलांतरित सरकारी कल्याणकारी योजनांचाही लाभ घेतात, असे तपासात समोर आले आहे.

काही महिन्यांपासून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्रातील इतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर कारवाई करत आहे. या कारवाईदरम्यान मतदार म्हणून भारतीय निवडणुकीत सहभागी होण्यासाठी या व्यक्तींनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा धक्कादायक तपशील समोर आलाय. वाढत्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष टास्क फोर्स तयार केली आहेत.

Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड

डीसीपी डॉ. प्रवीण मुंढे यांच्या नेतृत्वाखालील १४ सदस्यीय विशेष पोलीस तुकडीने कळंबोली, पनवेल, कोपर खैरणे, कल्याण, मुंब्रा (नवी मुंबई) आणि शिवडी दारूखाना, मानखुर्द आणि चेंबूर (मुंबई) येथे छापे टाकले, त्यामुळे १६ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आलीय. अधिकाऱ्यांनी संशयितांकडून आधार आणि पॅन कार्डसह बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आलीय. पुढील तपास सुरू असल्याची माहिती डीसीपी डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिलीय.

एका बांग्लादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. कामाठीपुरातील एका महिलेने या योजनेचा लाभ घेतला. याप्रकरणी पोलिसांनी ५ बांग्लादेशींना अटक केली आहे. याप्रकरणी एका दलालालाही अटक करण्यात आलीय. या बांग्लादेशी महिलेने भारतात घुसखोरी केल्या समोर आले होते. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply