Balasaheb Thorat : सत्ताधारीच गुन्हेगार झालेत, न्याय कोणाला मागायचा; आमदार बाळासाहेब थोरात यांचा खोचक टोला

Balasaheb Thorat : अहमदनगरला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून राज्य सरकारला धारेवर धरले. राज्य सरकारचा गुन्हेगारावरचा धाक संपलेला असल्याचे त्यांनी म्हटलंय. तर सत्ताधारीच गुन्हेगार झाले आहे. न्याय कोणाला मागायचा असा खोचक सवाल बाळासाहेब थोरात  यांनी केला आहे. भाजपचा आमदार मुख्यमंत्र्यांवर आरोप करतो. याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली. 

अहमदनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी चर्चा केली. राज्य शासन अपयशी ठरले आहे. हे तीन लोक झाले असून एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेले अशी उपरोधीक टीका त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या  राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयानंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधाऱ्यावर निशाणा साधला आहे. कुणी पक्ष बदलला तर असं सांगत नाही, की स्वतःच्या हितासाठी पक्ष बदलला हा माझा राजकीय हेतू होता. ते सगळे जनतेचेच हित सांगत असतात पण जनता सुद्धा दूधखुळी नाही. एखाद्या पारावरच्या इसमाला सांगितलं खरी शिवसेना कोणाची खरी राष्ट्रवादी कोणाची तो जे उत्तर देईल तो खरा न्याय.

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये तुफान राडा, भाजप-मविआ कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांकडून धरपकड

भाजप जिंकण्यासाठी काहीही करू शकते 

भाजप निवडणुका जिंकण्यासाठी काहीही करू शकतो. ईव्हीएममध्ये घोटाळा देखील करू शकतात. यावर आपला विश्वास बसत नव्हता. मात्र चंदिगड येथे झालेल्या महापौर निवडणुकीमध्ये ईव्हीएमबाबत छेडछाड झाली. सुप्रीम कोर्टाने देखील यावर ताशेरे ओढले आहेत. यावरून निश्चितच ईव्हीएममध्ये घोटाळा करता येऊ शकतो. यावर आपला विश्वास बसला असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे. 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply