Badlapur : बदलापूर घटनेप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; चामटोली गावातून २१ वर्षीय तरुणीला अटक

Badlapur : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत ४ वर्षीय चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला. ही वार्ता महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी या घटनेवर संताप व्यक्त करत आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे, पीडित मुलगी आणि तिच्या आईच्या प्रकृतीविषयी खोटे मॅसेज आणि अफवा पसरवणारा मजकूर सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणीला अटक केली आहे.

रुतिका (वय २१) असं या तरुणीचं नाव असून ती चामटोली गावात राहणारी आहे. ठाणे सायबर सेलने तांत्रिक पद्धतीने शोध तिला अटक केली आहे. तिच्याविरोधात अफवा पसरवून समाजात अशांतता पसरवल्याचा गुन्हा बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय.

Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंदला आरपीआय आठवले गटाचा पाठिंबा, महायुतीतील वादाच्या ठिणग्या उडणार?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलींवर अत्याचार झाल्यानंत रुतिका हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये पीडित मुलगी आणि तिच्या आईचा उल्लेख करण्यात आला होता. दोघांच्या प्रकृतीविषयीचा मजकूर पोस्टमध्ये होता. ही पोस्ट वाचल्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मनात संतापाची लाट उसळली होती.

दरम्यान, रुतिका हिने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. या पोस्टमुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्यामुळेच परिसरातील वातावरण बिघडले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातोय. याप्रकरणी सायबर सेलने तपासाची चक्रे फिरवत रुतिका हिला अटक केली आहे.

यानंतर सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या पोस्ट दिसल्या तर त्यावर विश्वास ठेवू नये. तसेच सदरील पोस्ट शेअर करू नये, असं आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांनी नागरिकांना केलंय. कोणीही अफवा पसरवल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देखील पोलिसांनी दिलाय.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply