
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सडकून टीका केली आहे. उस्मानाबादमधील ‘हिंदू गर्वगर्जना’ संवाद यात्रेदरम्यान भाषण करताना सावंत यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्याच्या मुद्द्यावरुन त्यांना हिणवण्यात आल्याचा संदर्भ आपल्या भाषणा दिला. मात्र ज्या नेत्याला ‘ब्राह्मण म्हणून हिणवण्यात आलं त्यानेच मराठ्यांची झोळी भरली’ असं विधान सावंत यांनी आपल्या भाषणात केलं.
मराठा सामाजाचे नेते असणाऱ्या सावंत यांनी उस्मानाबादमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केलेल्या भाषणात मराठा आरक्षणावरुन महाविकास आघाडीला लक्ष्य केलं. “आता बघा हे जे सरकार आलं २०१४ ते २०१९ दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रचंड आरोप केले. त्यांना प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न केला. मराठा क्रांती मोर्चा काढला. मग त्यांनी याला मुकामुर्चा म्हणून लिहिलं. मराठ्यांचा अपमान केला. आम्ही गप्प बसलो,” असं सावंत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी त्यांच्या जातीवरुन हिणवलं मात्र त्यांनीच मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याचं विधान सावंत यांनी केलं. “ब्राह्मण म्हणून हिणवलं गेलं त्या माणसाला. अरे पण त्याच ब्राम्हणानं या मराठ्यांची झोळी २०१७-१८ ला भरली. मराठ्यांना आरक्षण दिलं. ते टिकलं. दोन तीन बॅचेस बाहेर आल्या. त्यांना नोकऱ्या मिळाल्या,” असं सावंत म्हणाले.
मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सहा महिन्यांमध्ये आरक्षण गेल्याची आठवण सावंत यांनी करुन दिली. “२०१९ ला जेव्हा तुम्ही लोकांच्या विश्वासघात करुन सत्तेत आला. त्यावेळेस पुढच्या सहा महिन्यातच आमचं आरक्षण गेलं. म्हणजे आम्ही मराठे इतके मूर्ख, इतके वेंधळे की आम्हाला काहीच कळत नाही,” असं म्हणत सावंत यांनी आपल्या भाषणामधून महाविकास आघाडीतील घटक पक्षांना लक्ष्य केलं.
शहर
- काळजाचा थरकाप! अस्थी विसर्जन करायला जाताना पिकअपला डंपरची भीषण धडक, एकाच कुटुंबातील ८ जणांचा जागीच मृत्यू, ९ गंभीर
- पुणे: नसरापूर नराधम आरोपी भीमराव कांबळे विरोधात खटल्याला वेग; विशेष न्यायालयात साक्षीदारांचे जबाब नोंदवणे सुरू!
- पुणे: गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; खराडीत आयटी इंजिनिअरसह आई-वडिलांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू!
- मुंबई: जुहू बीचवर काळाचा घाला! जे.डब्ल्यू. मॅरियट हॉटेलजवळ बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू.
महाराष्ट्र
- काळजाचा थरकाप! अस्थी विसर्जन करायला जाताना पिकअपला डंपरची भीषण धडक, एकाच कुटुंबातील ८ जणांचा जागीच मृत्यू, ९ गंभीर
- पुणे: नसरापूर नराधम आरोपी भीमराव कांबळे विरोधात खटल्याला वेग; विशेष न्यायालयात साक्षीदारांचे जबाब नोंदवणे सुरू!
- पुणे: गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; खराडीत आयटी इंजिनिअरसह आई-वडिलांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू!
- मुंबई: जुहू बीचवर काळाचा घाला! जे.डब्ल्यू. मॅरियट हॉटेलजवळ बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू.
गुन्हा
- पुणे: नसरापूर नराधम आरोपी भीमराव कांबळे विरोधात खटल्याला वेग; विशेष न्यायालयात साक्षीदारांचे जबाब नोंदवणे सुरू!
- दिल्ली विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापिकेची घरातच हत्या; ओळखीच्या व्यक्तीचाच हात असल्याची शक्यता!
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा























Subscribe to my channel



