Aurangzeb Controversy : औरंगजेबाशी आमचा काही संबंध नाही, कबर जिथे हलवायची तिथे हलवा, खा. इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया

Aurangzeb Controversy : आम्हाला औरंगजेबाशी काही घेणं देणं नाही, त्याचा आमचा काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराविरोधात जलील आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान काही लोकांनी औरंगजेबाचा फोटो उंचावत घोषणाबाजी केली होती.

दरम्यान या प्रसंगानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी सारवासारव करत ज्यांनी फोटो दाखवला ते आमचे कार्यकर्ते नव्हते, आमच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी हे घडवून आणले गेले असा आरोप केला होता. त्यानंतर आता त्यांनी आमचा औरंगजेबाशी काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

खा. इम्तियाज जलील म्हणाले, आम्हाला औरंगजेबाशी काही घेणं देणं नाही, त्याचा आमचा काही संबंध नाही. जसं शहराचं नामांतर आमच्यावर लादलं तसा औरंगजेब आमच्यावर का लादता? असा सवाल देखीलत्यांनी विचारला आहे. 

पुढे बोलताना ते म्हणाले औरंगजेबाची कबर जिथे हलवायची तिथे हलवा, आम्हाला विचारताय की सांगताय हे कळायला मार्ग नाही आणि जर आमची परवानगी हवी असेल तर त्याचं एक पत्र घेऊन या, मग आम्ही बघू परवानगी द्यायची की नाही, असा टोलाही जलील यांनी लागावला.

तसेच आमचं उपोषण नाही तर साखळी आंदोलन आहे. त्यामुळे तिथे रोजच जेवण होणार. कदाचित माझं पहिल्या दिवशी मराठी चुकलं असेल म्हणून मी उपोषण म्हणालो असेल, असा यू टर्न इम्तियाज जलील यांनी घेतला.

या शहरात कायदा व्यवस्था बिघडवण्याला आम्ही जबाबदार नाही. आमचा काही संबंध नाही. तुम्ही नामांतर आमच्या शहरावर लादता आणि उलट आम्हालाच शहराचं वातावरण बिघडवत असल्याचे म्हणता, हे योग्य नाही असे जलील म्हणाले. 

आमचे आंदोलन शांतता प्रिय मार्गाने आहे, ते तसेच राहील. सगळ्यांनी शांतीने आंदोलन करावं कायदा व सुव्यवस्थेची काळजी सगळ्यांनी घ्यावी असा आवाहन मी यावेळी करतो असेही जलील म्हणाले. तसेच जो कोणी शांतीने आंदोलन करेल त्या सगळ्यांना आमचा पाठिंबा असेल असेही ते म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply