Arif Shaikh Death : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा आरिफ भाईजानचा मृत्यू, तुरुंगातच आला हार्ट अटॅक

Arif Shaikh Death : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा आरिफ भाईजान याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असताना आरिफच्या छातीत अचानक दुखू लागलं होतं. पोलिसांनी त्याला उपचारासाठी जे.जे रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचार सुरु असताना त्चा मृत्यू झाला. राष्ट्रीय तपास यंत्रणेने मे २०२२ रोजी आरिफला अटक केली होती.

गँगस्टर दाऊद इब्राहिमशीआणि त्याचा सहकारी छोटा शकील यांना मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. एनआयएने दाऊद इब्राहिमशी संबंधित टेरर फंडिंग प्रकरणात आरिफ भाईजानला अटक केली होती. न्यायालयाने त्याची रवानगी तुरुंगात केली होती. तेव्हापासून आरिफ हा आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत होता.

Weather Update : कोकणात पावसाचा जोर वाढणार! सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट,जगबुडी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी आरिफ भाईजानची अचानक तब्येत बिघडली. छातीत दुखू लागल्याने पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना आरिफचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

एकेकाळी आरिफ हा छोटा शकीलच्या सर्व ऑपरेशन्सचा मुख्य होता. २०१६ मध्ये मुंबई क्राइम ब्रँचच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलनं खंडणीच्या आरोपाखाली त्याला अटक केली होती. अरिफसह ९ आरोपींना २००६ मध्ये दुबईतून भारतात पाठवण्यात आलं होतं. त्यांच्यावर २००३ मध्ये गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री हरेन पंड्या यांची हत्या केल्याचा आरोपही होता.

आरिफ शेख, छोटा शकीलच्या आदेशानुसार काम करत होता, दाऊद टोळीसाठी कार्यरत होता. पश्चिम मुंबईतील काही भागात तो सक्रिय होता. आरिफ हा मीरा रोड येथे राहत होता. २०२० मध्ये त्याने छोटा शकीलची बहीण फहमिदासोबत लग्न केले होते.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply