Amravati Crime : काळं फासलं, मिरचीची धुरी अन् नग्न अवस्थेत धिंड, जादुटोण्याच्या संशयावरून ७७ वर्षीय महिलेसोबत अमानुष प्रकार

Amravati Crime : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटाच्या रेट्याखेडा गावात एक हादरवणारी घटना घडलीय. एका ७७ वर्षीय महिलेसोबत काही गावकऱ्यांनी अत्यंत क्रूरतेचा कळस गाठलाय. पीडित महिला जादुटोणा करत असल्याच्या संशयावरून त्यांची गावात नग्न अवस्थेत धिंड काढली. नंतर तोंडाला काळं फासलं. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. काळमी नंदराम शेलूकर असं पीडित महिलेचे नाव असून, या घटनेमुळे अमरावती जिल्हा हादरलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना मेळघाटाच्या रेट्याखेडा गावात घडलीय. ७७ वर्षीय महिला घरात एकटी राहत होती. तर तिची मुलं कामानिमित्त बाहेर असतात. याच एकट्या राहणाऱ्या महिलेसोबत काही गावकऱ्यांनी अत्याचाराचा कळस गाठला. जादूटोण्याच्या संशयावरून तिची गावात धिंड काढली आहे. तसेच विविध प्रकारचे अत्याचार देखील केले.

Nagpur police guard : शेअर बाजारात फटका, पोलिसाने ड्युटीवर असताना स्वत:वर गोळी झाडली, नागपुरात खळबळ

नेमकं घडलं काय?

पहाटे ४ वाजता महिला आधी शौचास गेली, तेथे काही गावकऱ्यांनी तिला पकडून दोरीने बांधून घेतलं. नंतर तिच्यावर अत्याचार करण्यास सुरूवात केली. आधी लोखंडी साखळीचे चटके दिले. नंतर मिरचीची धुरी दिली आणि तोंडाला काळं देखील फासलं. नंतर नग्न अवस्थेत तिची गावात धिंड काढली. या धक्कादायक घटनेनंतर ६ जानेवारीला तिने मुलांसह पोलीस ठाणे गाठले अन् तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय. त्यानंतर तिच्या दोन्ही मुलांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत, आईसोबत घडलेली घटना सांगितली. यानंतर खऱ्या अर्थाने घटनेला वाचा फुटली.

आईसोबत घडलेला अत्याचाराचा प्रकार, यासह पोलीस पाटलांनी त्यांच्या चार एकर शेतावर अंगणवाडी बांधल्याचा आरोप शेलूकर बंधूंनी केलाय.

या घटनेनंतर वृद्ध महिलेच्या तक्रारीनुसार, चिखलदरा पोलिसांनी भारतीय दंड संहितेनुसार आरोपींविरोधात काही गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, जादूटोणा विरोधी कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या प्रकरणाचे संपूर्ण चौकशी केली जाईल, त्यानंतर जादूटोणा संदर्भात गुन्हे लावले जातील, असे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply