Ambadas Danve : पीएम मोदींच्या दौऱ्याला विरोध, अंबादास दानवेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Sambhaji Nagar : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि जळगावमध्ये पीएम मोदी येणार आहेत. मोदी यांच्या दौऱ्याला महाविकास आघाडीने विरोध केला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दौऱ्याला विरोध केला आहे. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मानवी साखळी करत हा विरोध करण्यात आला. विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या अंबादास दानवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर विमानतळ परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,महाविकास आघाडीच्यावतीने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा विरोध करण्यात आला. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मानवी साखळी बनवत महाविकास आघाडीने विरोध केला. मातोश्री लॉन्सपासून विमानतळाच्या भिंतीपर्यंत मानवी साखळी बनवत हा विरोध केला गेला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे शेकडो पदाधिकारी यामध्ये सहभागी झालेत.

Maharashtra Rain Update : पुणे,नाशिकसह अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस; गोदावरी नदीला पूर, जाणून घ्या राज्यातील स्थिती

अंबादास दानवे हे आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन विमानतळाच्या दिशेने निघाले होते. आंदोलन करणाऱ्या विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासोबतच काही महिला कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. अंबादास दानवे यांचे आंदोलन पोलिसांनी आता अडवलेले आहे. पीएम मोदींच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या अंबादास दानवे आणि काही कार्यकर्त्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. मातोश्री लॉन्स परिसरात सध्या पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. महाविकास आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर पोलिसांची नजर आहे.

दरम्यान, पीएम मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल होत ते हेलिकॉप्टरने जळगावकडे रवाना होणार आहेत. पीएम मोदी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर येणार असल्यामुळे महाविकास आघाडीने त्यांना विरोध करण्यासाठी आंदोलन केले. ते आज संभाजीनगर आणि जळगाव या दोन जिल्ह्यामध्ये दौरा करणार आहेत. हे दोन्ही दौरे पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा हेलिकॉप्टरने संभाजीनगर विमानतळावर येऊन राजस्थानला जाणार आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply