अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एकदरे येथील सरपंच गेल्या तब्बल दोन वर्षांपासून फरार असल्याने ग्रामपंचायतीचे संपूर्ण कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. सरपंचाच्या अनुपस्थितीमुळे १५ व्या वित्त आयोगाचा आणि पेसा (PESA) अंतर्गत मिळालेला लाखो रुपयांचा विकास निधी खर्चाविना पडून राहिला असून, हा निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली असून, प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सरपंचाची अनुपस्थिती आणि फसवणुकीचा गुन्हा
एकदरे येथील सरपंच योगेश उर्फ रामा भांगरे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल असून, तो गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार आहे. पोलिसांचे शोध पथक त्याचा कसून शोध घेत आहे. राजूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सुमारे ७९ हजार ६०० रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद नोंदवली गेली असून, यापूर्वीही गावातील सुमारे ५० व्यक्तींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. फरार सरपंचाच्या या कृत्यामुळे गावाची मोठी बदनामी होत असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
विकासात्मक कामांना आणि दाखल्यांना मोठा अडथळा
एकदरे गावाची लोकसंख्या एक हजारांहून अधिक आहे. पाच सदस्यांच्या या ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच लीला भांगरे, नानासाहेब भांगरे, अनिल पोटे आणि मंदा भांगरे हे चार सदस्य कार्यरत आहेत. मात्र, सरपंच अनुपस्थित असल्यामुळे इतर सदस्यांना आर्थिक व प्रशासकीय अधिकार वापरता येत नाहीत. परिणामी, १५ व्या वित्त आयोगाचा सुमारे ८ लाख ४१ हजार रुपयांचा निधी तसेच पेसा अंतर्गत मिळालेला निधी तसाच पडून आहे.
दुसरीकडे, ग्रामसेवक युवराज वायळ यांना पेसा अंतर्गत कामातून कार्यमुक्त करण्यात आले असून, त्यांच्याजागी महिनाभर उलटूनही एकाही पर्यायी ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. यामुळे गावातील मूलभूत विकासकामे रखडली आहेतच, शिवाय ग्रामस्थांना विविध शासकीय दाखले व कागदपत्रे मिळवण्यातही नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ग्रामस्थांचा आंदोलनाचा पवित्रा
गटविकास अधिकारी अमर माने यांच्याकडे लेखी तक्रार देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थांनी आता ग्रामसभा घेत आक्रमक भूमिका घेतली आहे. सरपंचाच्या मनमानी कारभारामुळे आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे थांबलेला गावाचा विकास तातडीने पूर्ववत सुरू करावा, अन्यथा पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
शहर
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
महाराष्ट्र
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास
- रत्नागिरी: जिल्ह्याला दुष्काळाचा भीषण फटका १२ हजार ८५० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४३ हजारांहून अधिक शेतकरी संकटात
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!



























Subscribe to my channel




