Ajit Pawar : भाजप की राष्ट्रवादी? नाराजी नाट्यानंतर अजित पवार यांचे स्पष्टीकरण

Ajit Pawar Press Conference : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चा आणि घडामोडींवरून अनेक अंदाज बांधल्या जात आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.

अजित पवार पक्षप्रमुख शरद पवार यांच्याविरोधात बंड करून भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा रंगली आहे. या प्रकरणी द इंडियन एक्प्रेसमध्ये वृत्त देखील होते.या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) दुपारीअजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचं काम होतंय. माझ्यासंदर्भात ज्या बातम्या दाखविण्यात येत आहेत. त्यात काहीही तथ्य नसल्याचे सांगत पवारांनी ‘राजकीय भूकंपा’च्या चर्चेला पूर्णविराम दिला.

आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहोत आणि भविष्यातही राहणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी विधानभावनात आमदारांची बैठक बोलावली, अशी चर्चा देखील रंगली होती. यावर अजित पवार म्हणाले, सर्व आमदार विविध कामांसाठी आले होते. माझे काम देखी होते. कामासाठी सर्व आमदार भेटले, त्याचा वेगळा अर्थ काढू नका.

महाविकास आघाडीच्या सभेत मी बोललो नाही तर बातम्या होतात. मात्र बाळासाहेब थोरात बोलले नाही तर बातम्या होत नाहीत. माझ्यावर एवढ प्रेम उतू चाललं का. तुम्हाला आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, असे अजित पवार म्हणाले.

४० आमदारांच्या सह्या घेतल्या आहेत का?

अजित पवार म्हणाले, या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. कारण नसताना माझ्याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. माझ्याबाबत सुरू असलेल्या वावड्यांमध्ये तथ्य नाही. मी कोणत्या आमदारांच्या सह्या घेतल्या नाही. आम्ही राष्ट्रवादी पक्षासोबतच आहोत. ४० आमदारांच्या कोणत्याही पत्रावर सह्या घेतलेल्या नाहीत, असं त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत पवारांनी माध्यमांवर आगपाखड केली. आमच्याबद्दल बातम्या पेरण्याचं काम काही विघ्नसंतोषी मंडळी करत आहेत. पक्षाच्या बाहेरची लोकं विधान करतात. राष्ट्रवादीतील कोणीही माझ्याविरोधात नाही, असं पवारांनी म्हटलंय.

राष्ट्रवादीत राहणार हे प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ का?

माध्यमांचे प्रतिनिधी माझ्या घराबाहेर कॅमेरे लावतात. तुम्ही अंदाज व्यक्त करताय. या गोष्टी थांबवल्या पाहिजे. माध्यमांनी सभ्यता पाळली पाहिजे. मी राष्ट्रवादीतच राहणार हे काय आता प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ का, असा प्रश्न त्यांनी विचारलाय



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply