Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कार्यकर्त्याची पदयात्रा!

 

Ajit Pawar : लाडक्या नेत्याला चांगले पद मिळावे याकरीता दिवसरात्र राबणारे कार्यकर्ते सर्वांनी पाहिलेत. मात्र आपला नेता राज्याचा मुख्यमंत्री व्हावा याकरीता थेट शेकडो मैल पायी चालत जाणारा एक कार्यकर्ता नवी मुंबईत चर्चेत आला आहे.

सागर पवार असे या कार्यकर्त्याचे नाव असून त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत याकरीता थेट नेरुळ ते तुळजापूरपर्यंत पदयात्रा सुरू केली आहे. १५ नोव्हेंबरला बलिपतिप्रदेच्या मुहूर्तावर सागर पवार यांनी पदयात्रा सुरू केली आहे.

Jalna OBC Sabha : जालन्यात ओबीसींचा महाएल्गार; 'या' आहेत प्रमुख मागण्या

नेरुळ येथील सागर पवार यांनी अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, असा देवीला नवस केला आहे. हा नवस पूर्ण होण्याकरीता नेरुळ ते तुळजापूर अशी पदयात्रा काढणार आहेत. १५ नोव्हेंबरपासून सुरू झालेली पदयात्रा जवळपास १२ दिवस चालत गेल्यानंतर तुळजापूर येथे पोहचणार आहे.

त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी आई तुळजा भवानीच्या चरणी साकडे घालण्यात येणार आहे. या अनोख्या पदयात्रेची चर्चा नवी मुंबई परिसरात चांगलीच रंगली आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी आदर्श व्यक्ती असते. ज्याचे अनुकरण आपण करत असतो. अजित पवार हे आपले राजकीय आदर्श नेते असल्याचे सागर पवार सांगतात.

अजित पवार यांचे वत्कृत्व, हजरजबाबीपणा,  प्रशासनावर असणारी जरब आदी बाबींमुळे तरुणांवर त्यांचे गारुड आहे. जनसामान्यांशी नाळ असणाऱ्या अशा नेत्याने महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, महाराष्ट्राच्या सत्तेची धुरा त्यांच्या हाती यावी, समाजातील विविध घटकांना एकत्र करण्याची कला त्यांच्यात आहे.

असा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यास समाजाचे भले होईल, असे सागर यांना वाटते. त्यासाठी तुळजा भवानी पुढे जाऊन  अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत याकरीता साकडे घालणार असल्याचे सागर पवार यांनी संगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply