Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Ahmedabad  : समालोचन बॉक्समध्ये बसून माझ्यावर टीका करणाऱ्यांपेक्षा मी स्वतः माझा खेळ अधिक जाणतो, अशा शब्दात विराट कोहलीने टीकाकारांना उत्तर दिले आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात ४४ चेंडूत नाबाद ७० धावांची खेळी केल्यानंतर विराटने ही आक्रमक ‘बोलंदाजी’ केली.

या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप स्वतःकडेच सन्मानाने ठेवत असलेल्या विराटच्या स्ट्राईक रेटबाबत माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांच्यासह काहींनी विराटच्या स्ट्राईक रेटबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात एकीकडे रजत पाटिदार २० चेंडूत ५० धावा करत असताना विराटला ४३ चेंडूत ५१ धावाच करता आल्या होत्या.

म्हणूनच मी गेली १५ वर्षे इतका सरस खेळ करत आलो आहे. मी माझे काम करत आहे. लोक त्यांना आवडेल ते काहीही बोलत असतात. माझा स्ट्राईक रेट कमी आहे आणि मला फिरकी गोलंदाजी खेळता येत नाही, असेही बोलले जात आहे; पण माझा खेळ कसा आहे हे मीच जाणतो, अशा शब्दात कोहली टीकाकारांवर आपली नाराजी व्यक्त करत होता.

KKR Vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

विराट कोहली सर्वाधिक धावा करत असला तरी त्याच्या बंगळूर संघाला यंदा आत्तापर्यंत केवळ तीनच सामने जिंकता आलेले आहेत, त्यामुळे १० संघांत त्याचा हा संघ १०व्या स्थानावर आहे.

आम्ही आमच्या सन्मानासाठी खेळत असतो. जे प्रेक्षक आमच्या पाठीशी असतात त्यांच्यासाठी खेळत असतो. यंदाच्या स्पर्धेत आम्ही आमच्या प्रतिष्ठेनुसार खेळ केलेला नाही हे सत्य असले तरी पुढच्या सामन्यात अधिक चांगला खेळ करू याचा विश्वास आम्हाला आहे, असे मत विराटने व्यक्त केले.

बंगळूरने गुजरातवर मिळवलेल्या विजयात विल जॅक्सने जबरदस्त शतकी खेळी केली. या खेळीबाबत बोलताना विराट म्हणाला, त्याची फलंदाजी अनन्यसाधारण होती. ज्या प्रकारे आपण चेंडू टोलावू शकतो त्यात यश मिळत नसल्यामुळे तो स्वतःवरच नाराज होता; पण त्याची सर्व भरपाई त्याने रविवारच्या सामन्यात केली. मी त्याला संयम राखण्याचाच सल्ला देत होतो.

जॅक्सने ५० ते १०० ही मजल केवळ १० चेंडूत मारली, त्यामुळे बंगळूर संघाने १६व्या षटकांतच विजय साकार केला. जॅक्सची एकूण खेळी ४० चेंडूत नाबाद १०० अशी होती, त्यात त्याने पाच चौकार आणि १० षटकार मारले.

जॅक्सच्या किती तुफानी फलंदाजी करू शकतो, याची आम्हाला जाणीव होती. फक्त त्याला लय मिळण्याचा अवकाश होता. त्याने मोहित शर्माच्या एकाच षटकात २९ धावांचे तुफान आणले आणि त्यानंतर रशीद खानची धुलाई केली, त्यामुळे आम्हाला १६व्या षटकांतच द्विशतकी आव्हान पार करता आले, असे विराटने सांगितले.

सुरुवातीला मला लय मिळत नव्हती; पण विराटने संयम राखण्याचा सल्ला दिला, सकारात्मक विचार करत राहा असेही तो सांगत होता. याचा मला फायदा झाला. मोहित शर्माच्या एका षटकाने मला आत्मविश्वास मिळाला आणि त्यानंतर मी मागे वळून पाहिले नाही, असे जॅक्सने सामन्यानंतर सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply