
Ahilyanagar : संगमनेरमध्ये अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. इयत्ता सहावीच्या विद्यार्थीनीवर अज्ञात आरोपीने थेट ॲसिड हल्ला केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अवघ्या ते दहा ते बरा वर्षाच्या मुलीवर अशाप्रकारे हल्ला झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी जात होती. आपल्यावर अशाप्रकारे हल्ला होईल? असं तिला कधीही वाटलं नव्हतं. पण अचानक एका नराधमाने तिच्यावर थेट ॲसिड हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर शाळेत शिक्षण घेणाऱ्या चिमुकली मुलीदेखील सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
संगमनेर तालुक्यात पुन्हा एकदा मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगाव पान परिसरात शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या अवघ्या पाचवी-सहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीने ॲसिड फेकून हल्ला केला. या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शाळेतून घरी जात असताना अचानक हल्लेखोराने मुलीवर अॅसिड फेकल्याची माहिती समोर येत आहे. हल्ल्यानंतर मुलीने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक तत्काळ धावून आले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती देत मुलीला उपचारासाठी लोणी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
अल्पवयीन मुलीवर असा अमानुष हल्ला करणाऱ्या नराधमाला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी. सदर विद्यार्थिनी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या क्रूर आणि निर्घृण हल्ल्यामुळे संगमनेर तालुक्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्पवयीन मुलीवर असा अमानुष हल्ला करणाऱ्या नराधमाला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. हल्लेखोर तरुण असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
शहर
- Pune : पुण्यात धक्कादायक घटना; जुन्या वादातून तरुणाला गाठून निर्घृण हत्या
- LPG संकट : इराण-इस्रायल युद्धाचा फटका महाराष्ट्रातील स्वयंपाकघराला; बीड, चंद्रपूरसह पुण्यातही गॅस तुटवडा!
- शशी थरूर यांचा कॉलम:‘प्रहार”मुळे सुरक्षा व्यवस्थेचा समन्वय बळकट होईल
- Baramati Bypoll Election : बारामतीत राजकीय हालचालींना वेग; बिनविरोध की निवडणुकीची रणधुमाळी?
महाराष्ट्र
- शशी थरूर यांचा कॉलम:‘प्रहार”मुळे सुरक्षा व्यवस्थेचा समन्वय बळकट होईल
- Shirur : टाकळी हाजी येथे शासकीय योजनांची माहिती; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन
- प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगळी : सत्याच्या अनेक बाजू समजून घ्या- बलराज संघई
- Mumbai : महाराष्ट्रात एलपीजी संकट! पश्चिम आशियातील युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत; गॅस एजन्सींना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश
गुन्हा
- शशी थरूर यांचा कॉलम:‘प्रहार”मुळे सुरक्षा व्यवस्थेचा समन्वय बळकट होईल
- Pune Crime : अल्पवयीन मुलीसोबत संबंध; बोलावून तरुणाला बेदम मारहाण, बॉयफ्रेंडचा मृत्यू
- Pune - पुण्यातील वाघोलीत रक्ताचा सडा! चहा पिणाऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यात खुपसला कोयता; थरार सीसीटीव्हीत कैद
- प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगळी : सत्याच्या अनेक बाजू समजून घ्या- बलराज संघई
राजकीय
- मिरज पंचायत समितीत काँग्रेसची बाजी, भाजपच्या बालेकिल्ल्यात आघाडीचा धक्का
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
इतर
- सरकार तुमचे बँक खाते गोठवू शकत नाही: आर्थिक संकटाच्या व्हायरल दाव्याची पडताळणी
- नाशिकमध्ये निवडणुकीतील पराभव जिव्हारी, राजकीय नेत्याचा युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
- राज्यात उन्हाचा कडाका वाढला: उष्माघातापासून बचावासाठी आरोग्य विभागाकडून 'अॅडव्हायजरी' जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- Pune- पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! २३ गावांच्या विकासासाठी ९५४ कोटींचा ‘बूस्टर डोस’
मनोरंजन
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
विडियो गॅलेरी

देश विदेश
- Mumbai : महाराष्ट्रात एलपीजी संकट! पश्चिम आशियातील युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत; गॅस एजन्सींना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश
- नांदेडच्या औद्योगिक शिरपेचात मानाचा तुरा! ४,२५० कोटींचा हेलिकॉप्टर प्रकल्प जाहीर; हजारो तरुणांना मिळणार रोजगार
- LPG टंचाई: सिलिंडर वाहनांना पोलीस सुरक्षा द्या आणि तात्काळ 'कंट्रोल रुम' उभारा; राज्य सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश
- गॅस टंचाई हाताळण्यासाठी केंद्र सरकार सरसावले: हॉटेल्सना पर्यायी इंधन, राज्यांना अतिरिक्त रॉकेल
























Subscribe to my channel

