Ahilyanagar Crime : अहिल्यानगरात खळबळ! २० जणांचे टोळके आले, किराणा दुकानात गेले, पुढे घडले ते भयंकर

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात भर दिवसा २० जणांचे टोळक्याने तीन जणांना बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर किराणा मालाचे दुकान पेटवून देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे बोलले जात आहे. सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाली होती. त्यानंतर राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का नाही? हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. यानंतर थेट केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ताजी असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एका तरुणाचे अपहरण करून त्याला अमानुषपणे मारहाण करून त्याला जिवंत जाळण्यात आल्याचा प्रकारही समोर आला आहे.

दरम्यान या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी पकडले नाही, तोच पुन्हा आज अहिल्यानगर शहराजवळ असलेल्या निंबळक परिसरात २० जणांच्या टोळक्याने एक किराणा मालाचे दुकान जाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात नेमकं चाललय काय? कायदा सुव्यवस्था कोणाच्या भरोशावर आहे असा प्रश्न समोर येत आहे.

Swargate Bus Depot Case : शिवशाही अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट; दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी पूर्ण, तपासाला वेग येणार

टोळक्याची हिंमत वाढली

निंबळक बायपास चौकात संदीप कोतकर, विलास कोतकर, राजू कोतकर, दत्तु कोतकर यांच्यावर अनोळखी टोळीकडून अचानक प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्यात तीनही बंधू जखमी झाले असून टोळक्याची हिम्मत एवढी की त्यांनी कोतकर यांचे किराणा दुकान जाळून टाकण्याचा देखील प्रयत्न केला आहे. सदरची घटना ज्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली त्या पोलीस स्टेशन कारभाराबद्दल नुकतेच परिसरातील उद्योजकांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून एमआयडीसीमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.

हल्ल्याचे कारण अस्पष्ट

आमदार संग्राम जगताप यांनीही याबाबत आवाज उठवला, तरीही एमआयडीसी पोलिसांचा धाक कुठेतरी कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे भर दिवसा टोळक्याने येऊन अमानुष हल्ला करत तीन जणांना गंभीर जखमी केले आहे. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून एमआयडीसी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply