Mumbai : मंदिराला खरा धोका भाजपपासून, दादरमधून आदित्य ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Mumbai : 'मंदिराला खरा धोका भाजपपासून आहे. भाजपला महाराष्ट्रावर, येथील मंदिरावर आणि लोकांवर बुलडोझर फिरवायचा आहे, असं म्हणत आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. दादर स्थानकावर विकासात्मक कामे करण्यासाठी दादर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे असणारे सुमारे ८० वर्ष जुने हनुमान मंदिर हटवण्याची नोटीस देण्यात आली होती.

मध्य रेल्वेकडून मंदिर प्रशासनाला ही नोटीस देण्यात आली होती. मात्र, या निर्णयाच्या विरेधात ठाकरे गट मैदानात उतरला. उद्धव ठाकरे यांनी मंदिराचा मुद्दा उचलत भाजप सरकारवर निशाणा साधला. तर आज आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी हनुमान मंदिरात जाऊन महाआरती केली.

BMC Election: ठाकरे-भाजपमध्ये हनुमानवरून युद्ध; मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी हिंदुत्वावरून लढाई

आज आदित्य ठाकरे यांनी हनुमान मंदिरात जाऊन महाआरती केली. त्यानंतर भाजपवर तिखट शब्दात टीकेचे बाण सोडले. भाजप फक्त हिंदुत्त्वाचा वापर निवडणुकीपुरतं करतात. ११ डिसेंबरला आपण ते उघडकीस आणलं. अनेक मंदिरे कॉरिडॉरच्या नावाखाली भाजपने तोडली आहेत. तेवढी कोणीच तोडली नसतील. राम मंदिरातल्या अवतीभवतीच्या जागा लोढा बिल्डरला दिल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला.
भाजपला महाराष्ट्रातील मंदिरावर आणि लोकांवर बुलडोझर फिरवायचा आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत इशारा दिला होता. हनुमान यांच्या आशीर्वादाने हे मंदिर वाचलं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करत असताना दुसर्‍या धर्माचा तिरस्कार करण्याची गरज नाही. भाजपचं हिंदुत्व फक्त निवडणुकीपुरतंच असल्याचा आरोप ठाकरे यांनी भाजपवर केला.

'भगवान हनुमान यांची छाती फाडली तर राम-लक्ष्मण आणि सीता दिसले होते. आमची छाती फाडून बघाल तर संविधान दिसेल. जेव्हा महाराष्ट्राला गरज लागेल तेव्हा लढावं लागेल आणि जिंकावं लागेल, असं त्यांनी संविधानावर भाष्य केलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply