Accident News : पुणे-नाशिक महामार्गावर तीन वाहने एकमेकांवर आदळली; विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Accident News : पुणे नाशिक महामार्गावर पेट घाटात भीषण अपघात झाला आहे. पेट घाटात टेम्पो, कंटेनर आणि कारचा तिहेरी अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा होरपळून मृत्यू झालाय, तर एक गंभीर जखमी आहे. 

अपघातात कारने अचानक  पेट घेतला. त्यामुळं तिघांचा आगीत होरपळून मृत्यु झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे. पहाटे सहा वाजेदरम्यान हा अपघात झाला आहे. घाटात उतारावर कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यामुळं हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात  आहे.

Mumbai Fire News : मुंबईतील गोवंडी परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग; अनेक झोपड्या जळून खाक

 

तीन वाहने एकमेकांवर आदळले

या अपघातामुळे महामार्गावर वाहतुक कोंडी झाली होती. रोहिदास राक्षे, विराज कदम, आणि अंकुश भांबुरे असे अपघातात  होरपळुन मृत्यु झालेल्या तरुणांची नावे आहेत. हा अतिशय भीषण अपघात होता. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर तीन वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे. या विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. रस्त्यावर सर्वत्र रक्त पडलेले होते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply