Accident : मध्यरात्री हायवेवर मृत्यूचं तांडव, लग्नाहून आलेली कार आधी डिव्हायडरला धडकली मग….; ६ जणांचा मृत्यू

image

राजस्थानमधील कलाखो गावातील ६ तरूण कारमधून प्रवास करत होते. ते लग्नानंतर घराकडे परत येत होते. पण त्याचवेळी काळाने घाला घातला. त्यांची कार अतिशय वेगात होती. त्याचवेळी अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले अन् गाडी बाजूच्या डिव्हायडरला जोरात धडक झाली. कारचा वेग इतका होता की डिव्हायडरला धडकल्यानंतर महामार्गावरून दुसऱ्या लेनने जाणाऱ्या ट्रेलरला जोरात धडक दिली.

या धडकेमुळे कारचा पूर्ण चुराडा झाला. यामध्ये चौघांचा जागेवरच मृत्यू झाला, तर उपचारासाठी नेत असताना २ जणांनी प्राण सोडले. गोवर्धन योगी, बनवारी लाल योगी, हरिमोहन योगी, लालराम बैरवा आणि रामसिंह योगी यांचा अपघातात मृत्यू झाला. सर्व मृतदहे वेगवेगळ्या रूग्णलायत पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *