पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण

 

 

 


सिल्वासा : गुजरातमधील सिल्वासा शहरात पुण्याची कन्या आर्या योगिता महेश नाचण हिने उल्लेखनीय यश संपादन करत महाराष्ट्राचा मान उंचावला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या CBSE दहावी बोर्ड परीक्षेच्या 2026 च्या निकालात तिने माऊंट लिट्रा झी स्कूल, नारोली (सिल्वासा) येथून शिक्षण घेत शाळेत अव्वल स्थान पटकावले आहे.

आर्याने Artificial Intelligence या विषयात तब्बल 100 पैकी 100 गुण मिळवत आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली असून एकूण 93.20% गुणांसह उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

विशेष म्हणजे तिचा शैक्षणिक प्रवास अत्यंत वेगळा आणि आव्हानात्मक राहिला आहे. पुण्यातून सुरुवात करत तिने दुबई, जम्मू-काश्मीर आणि आता गुजरातमधील सिल्वासा असा प्रवास करत शिक्षण पूर्ण केले. विविध ठिकाणच्या बदलत्या वातावरणातही तिने सातत्याने मेहनत घेत हे यश मिळवले आहे.

तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुणे शहरासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

3 thoughts on “पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण

Leave a Reply to Damian344 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *