Virat Kohli: कोहलीला संघात न घेण्यासाठी भारतात कारणे का शोधतात? विराटसाठी दिग्गज खेळाडूची ‘बॅटिंग’

Ricky Ponting on Virat Kohli T20 World Cup 2024 : विराट कोहलीला संघात न घेण्यासाठी भारतात कारणे का शोधतात? ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी माझी पहिली पसंती विराट कोहली हीच असती, अशा शब्दात ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंगने विराटसाठी बॅटिंग केली आहे.

या आयपीएलमध्ये विराट कोहली कमालीचे सातत्य दाखवत आहे. १४ सामन्यांत मिळून त्याने एका शतकासह सर्वाधिक ७०८ धावा केल्या आहेत; परंतु स्ट्राईक रेटवरून त्याच्यावर टीका केली जात आहे.

विराट कोहलीचा दर्जा आणि अनुभव याची तुलना कोणाबरोबरही होऊ शकत नाही किंवा दुसरा कोणताही तेवढा सक्षम पर्यायही नाही, त्यामुळे माझ्यासाठी विराट हा पहिल्या पसंतीचा खेळाडू आहे, असे सांगून पाँटिंग म्हणतो, हा प्रकार केवळ हास्यास्पद आहे, कारण भारतातील लोक नेहमीच कारणांचा शोध घेत असतात किंवा तो इतर काही खेळाडूंपेक्षा सरस ठरणार नाही, असे सांगतात.

येत्या विश्वकरंडक स्पर्धेत विराटने रोहित शर्मासह सलामीला खेळावे. सूर्यकुमारसारखे खेळाडू मधल्या फळीत सरासरी उंचावण्यासाठी सक्षम आहेत, असेही पाँटिंगने सुचवले आहे. निवड समितीला हा निर्णय घ्यावा लागेल, कारण यशस्वी जयस्वाल हा तेवढासा फॉर्मात नाही. डावखुरा फलंदाज म्हणून त्याला संघात ठेवायचे असेल तर मधल्या फळीत खेळवावे, असे पाँटिंगने सुचवले आहे.

Hardik Pandya IPL 2024 : 'हार्दिक पांड्याला कर्णधार बनवणे...' मुंबई इंडियन्सच्या माजी कर्णधाराचं धक्कादायक वक्तव्य

कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये एक शतक केले आहे. आयपीएलमध्ये त्याचे हे एकूण आठवे शतक आहे. त्याच्या अशा सातत्यपूर्ण कामगिरीमुळे बंगळूर संघाला यंदाच्या स्पर्धेत प्ले ऑफ गाठता आलेला आहे.

विराटच्या स्ट्राईक रेटबाबत बोलले जात असले तरी यंदाच्या स्पर्धेत त्याचा स्ट्राईक रेट १५५.६० इतका आहे. गेल्या १७ वर्षांतील हा त्याचा सर्वोत्तम स्ट्राईक रेट आहे. सध्याच्या युगात सरासरीपेक्षा स्ट्राईक रेटला अधिक महत्त्व दिले जाते; परंतु विराटच्या भारतीय संघातील उपयुक्ततेला दुसरा पर्याय नाही, असे पाँटिंगने सांगितले.

तीन-चार वर्षांपूर्वी वरच्या क्रमांकावर खेळणारा फलंदाज ६० चेंडूत ८० किंवा १०० धावा करत होता त्यासुद्धा पुरेशा होत्या. त्यावेळी कोणी स्ट्राईक रेटबाबत बोलत नव्हते; परंतु आता सर्वाधिक चर्चा स्ट्राईक रेटची असते. ५५ चेंडूत ८० धावांऐवजी १५ चेंडूत ४० धावा यांना अधिक महत्त्व दिले जाते, अशी तुलना पाँटिंगने केली.

२०२२ मधील ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत विराटने पाकिस्तानविरुद्ध ८२ धावांची जबरदस्त खेळी केली होती. त्यानंतर उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्धही अर्धशतक केले होते. कठीण परिस्थितीत भरवसा सिद्ध करणारा फलंदाजच महान असतो, असे पाँटिंगने म्हटले.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply