Raju Patil : लाखोंच्या मताधिक्याने कुणी निवडून येणार नाही; मनसे आमदार राजू पाटील यांचा श्रीकांत शिंदे यांना सल्ला

Raju Patil : कल्याण लोकसभा ही काठावर पास होण्यासारखी स्थिती आहे. इथे अँटीइन्कबन्सी आहे. लाखो मतधिकाक्याने काेणी निवडणूक जिंकणार असे चित्र नाही. महायुतीत धुसफूस सुरु आहे. त्यात ही राष्ट्रवादी आली आहे. ज्यांना निवडून यायचे आहे. त्यांनी सावरुन घ्यावे; असा सल्ला मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना नाव न घेता दिला आहे. 

शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी बारामती निवडणूक लढवण्याचे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आनंद परांजपे यांनी या नेत्यांना समजवा, अन्यथा कल्याणचा निकाल वेगळा लागू शकतो; असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला होता. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी निवडून यायचं असेल तर त्यांनी सावरून घ्या असा सल्ला नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे यांना दिला आहे.

Vijay Shivtare On Ajit Pawar : देवाची शपथ घेऊन सांगतो, अजित पवार..., विजय शिवतारे काय काय म्हणाले?

दोन दिवसात ४० विकास कामांचे भूमीपूजन गेल्या दोन दिवसापासून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात भूमीपूजनाचे कार्यक्रम सुरु आहेत. त्यामध्ये ठाणे जिल्हा परिषद, नवी मुंबई महापालिका, ठाणे महापालिका आणि कल्याण डोंबिवली महापालिका अशा चार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध लेखाशीर्षाखाली विकास कामे मंजूर करण्यात आली आहे. जवळपास २६ कोटी ५० लाख रुपये खर्चाची कामे मंजूर झाली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या कामांचे भूमीपूजन सुरु केले आहे. आत्तापर्यंत ४० पेक्षा जास्त विकास कामांचे भूमीपूजन झाले असल्याची माहिती मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply