
पुणे: पुण्यातील वाघोली परिसरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकेवर काढले असून, दिवसाढवळ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, हल्ला इतका भीषण होता की आरोपीने मारलेला कोयता विद्यार्थ्याच्या डोक्यातच अडकून राहिला. या रक्तरंजित घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना वाघोलीतील रायसोनी कॉलेज (Raisoni College) समोरील 'अखंड अमृततुल्य' हॉटेल येथे घडली. जखमी विद्यार्थ्याचे नाव नागेश सुनील जगताप (वय २२) असून, तो कॉम्प्युटर सायन्सच्या चौथ्या वर्षात शिकत आहे. गुरुवारी दुपारी ३:३० च्या सुमारास नागेश आणि त्याचा मित्र सिद्धेश भोसले हॉटेलबाहेर चहा पिण्यासाठी बसले होते.
त्याच वेळी दुचाकीवरून आरोपी मंगेश सांगळे हा त्याच्या दोन साथीदारांसह तिथे आला. "तू मला शिवी का दिलीस?" असा जाब विचारत त्यांच्यात वादावादी झाली. या वादाचे रूपांतर काही क्षणातच भीषण हल्ल्यात झाले.
डोक्यात कोयता अडकला, तरीही...
आरोपींनी सोबत आणलेल्या कोयत्याने नागेशवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. नागेशच्या पाठीवर आणि शरीरावर वार केल्यानंतर, एक वार थेट त्याच्या डोक्यात करण्यात आला. हा वार इतका जोरात होता की कोयता नागेशच्या डोक्यातच रुतून बसला. जखमी नागेश याच अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला त्याचा मित्र सिद्धेश याच्यावरही आरोपींनी वार केले, ज्यात तोही जखमी झाला आहे.
सीसीटीव्हीमध्ये थरार कैद
या संपूर्ण घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ हॉटेलबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर आरोपींनी तिथून पळ काढला. नागेशला तातडीने वाघोलीतील खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर अधिक उपचारांसाठी खराडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याच्या डोक्यातील कोयता बाहेर काढला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी वाघोली पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवून मुख्य आरोपी मंगेश सांगळे (वय २३) आणि पवन राठोड (वय १८) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा (IPC 307) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा कॉलेज परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शहर
- Chhatrapati Sambhajinagar : ‘खतरों के खिलाडी’ शोसाठी ५० लाखांची फसवणूक; संभाजीनगरच्या प्राध्यापकाची हत्या, जंगलात ‘दृश्यम’ स्टाईल मृतदेह पुरला, ४० दिवसांनी गूढ उकल
- Pune Metro : पुणे मेट्रोसाठी ‘फीडर बस’ सेवा प्रस्तावित; PMPMLला नवा पर्याय, पहिल्या टप्प्यात दोन मार्गांवर सुरूवात
- Pune : पुरंदरमध्ये नव्या आयटी पार्कचा प्रस्ताव; हिंजवडीवरील ताण कमी करण्यासाठी विमानतळाजवळ प्रकल्प
- अमर हबीब यांचा कॉलम:यंदाही का करावा लागतो आहे अन्नत्याग?
महाराष्ट्र
- प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगळी : सत्याच्या अनेक बाजू समजून घ्या- बलराज संघई
- Mumbai : महाराष्ट्रात एलपीजी संकट! पश्चिम आशियातील युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत; गॅस एजन्सींना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश
- अमर हबीब यांचा कॉलम:यंदाही का करावा लागतो आहे अन्नत्याग?
- वैद्यकीय शिक्षण मंत्री माधुरी मिसाळ यांचा कॉलम:ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ महत्त्वपूर्ण
गुन्हा
- अमर हबीब यांचा कॉलम:यंदाही का करावा लागतो आहे अन्नत्याग?
- वैद्यकीय शिक्षण मंत्री माधुरी मिसाळ यांचा कॉलम:ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ महत्त्वपूर्ण
- Pune : पुण्यात मोठी कारवाई, टीप मिळताच पोलिसांचा सापळा, फॉर्च्युनर थांबताच 40 लाखांचा मुद्देमाल जप्त
- रश्मी बन्सल यांचा कॉलम :थोडीशी काळजी वाटणे चांगले,अवास्तव चिंता काय कामाची?
राजकीय
- मिरज पंचायत समितीत काँग्रेसची बाजी, भाजपच्या बालेकिल्ल्यात आघाडीचा धक्का
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
इतर
- सरकार तुमचे बँक खाते गोठवू शकत नाही: आर्थिक संकटाच्या व्हायरल दाव्याची पडताळणी
- नाशिकमध्ये निवडणुकीतील पराभव जिव्हारी, राजकीय नेत्याचा युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
- राज्यात उन्हाचा कडाका वाढला: उष्माघातापासून बचावासाठी आरोग्य विभागाकडून 'अॅडव्हायजरी' जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- Pune- पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! २३ गावांच्या विकासासाठी ९५४ कोटींचा ‘बूस्टर डोस’
मनोरंजन
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नांदेडच्या औद्योगिक शिरपेचात मानाचा तुरा! ४,२५० कोटींचा हेलिकॉप्टर प्रकल्प जाहीर; हजारो तरुणांना मिळणार रोजगार
- LPG टंचाई: सिलिंडर वाहनांना पोलीस सुरक्षा द्या आणि तात्काळ 'कंट्रोल रुम' उभारा; राज्य सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश
- गॅस टंचाई हाताळण्यासाठी केंद्र सरकार सरसावले: हॉटेल्सना पर्यायी इंधन, राज्यांना अतिरिक्त रॉकेल
- मुंबईत खलिस्तानी संघटनेच्या नावाने बॉम्बस्फोटाची धमकी; तपासानंतर अफवा असल्याचे स्पष्ट.

























Subscribe to my channel


